"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
== इतिहास ==
===प्राचीन इतिहास===
या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते.  हे पूर्वेला [[वऱ्हाड|बेरार]] (प्राचीन [[विदर्भ]]), उत्तरेस [[निमाड|निमाड़]] जिल्हा (प्राचीन अनुपा) आणि दक्षिणेस [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] (प्राचीन मुलका) आणि [[बीड जिल्हा|भीर]] (प्राचीन [[अश्मक]]) जिल्ह्यांनी व्यापलेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dhule.gov.in/history/|title=History {{!}} District Dhule , Government of Maharashtra {{!}} India|language=en-US|access-date=2021-08-01}}</ref>
 
===खान्देश पूर्व इतिहास===
ओळ ४१:
===खान्देश राज्याची स्थापना===
 
या प्रदेशात [[दिल्ली सल्तनत]] सत्तेवर आल्यानंतर, मलिक राजाने खान्देशचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. 
 
'''दिल्ली राजवंश''' 
 
१२९५ मध्ये जेव्हा दिल्लीच्या [[अल्लाउद्दीन खिलजी|अलाउद्दीन खिलजीने]] खान्देशवर ताबा मिळवला तेव्हा खानदेश असिरगडच्या चौहान शासकाच्या ताब्यात होता. दिल्लीच्या विविध राजवंशांनी पुढील शतकात खानदेशावर नियंत्रण ठेवले. १३७० ते १६०० पर्यंत फारुकी राजघराण्याने खानदेशावर राज्य केले. खानजहान फारुकीचा मुलगा मलिक राजा याने खान्देशचा स्वतंत्र राज्य म्हणून पाया घातला. आणि [[बऱ्हाणपूर|बुरहानपूरला]] राजधानी बनवण्यात आले. [[फिरोजशाह तुघलक|फिरोज शाह तुघलक]] (१३०९ - २० सप्टेंबर १३८८) ने सुरवातीला मलिक राजाला खानदेश प्रदेशाचा सरदार म्हणून नियुक्त केले होते, परंतु फिरोज तुघलकच्या मृत्यूनंतर त्याने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले आणि १३९९ पर्यंत राज्य केले. 
 
'''मुघल राजवट''' 
 
१५९९ मध्ये जेव्हा [[मुघल साम्राज्य|मुघल]] राजा [[अकबर|अकबराच्या]] सैन्याने खानदेशावर कब्जा केला आणि असीरगढ काबीज केले तेव्हा अकबराचा मुलगा दानियालच्या नावावरून काही काळासाठी खानदेशचे नाव दानदेश असे ठेवले गेले होते.  १६४० मध्ये शहाजहानने तोदर मलची महसूल प्रणाली खानदेशात सुरू केली (ही महसूल प्रणाली १८१८ मध्ये [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटीश राजवट]] येण्यापूर्वी पर्यंत वापरली जात होती). १७ वे शतक हे खान्देशचा सगळ्यात समृद्ध काळ मानला गेला आहे.  या काळात कापूस, तांदूळ, नीळ, ऊस आणि कापडाचा व्यापार खान्देशात मोठ्या प्रमाणावर होत असे.  मराठ्यांनी १७६० मध्ये असीरगढ काबीज करेपर्यंत मुघल शासन टिकले. 
 
===मराठा साम्राज्य (हिंदवी स्वराज्य)===
 
खान्देशात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे]] छापे १६७० मध्ये सुरू झाले आणि पुढील शतकात मुघल आणि मराठ्यांनी नियंत्रणासाठी संघर्ष केला. १७६० मध्ये [[पेशवे|पेशव्यांनी]] मुघल शासकाला हरवून खानदेशावर नियंत्रण मिळवले. [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव II]] ला जून १८१८ मध्ये ब्रिटिशांना शरण जावे लागले, परंतु तद्नंतरसुद्धा खानदेशात तुरळक युद्ध चालू राहिले हे पेशव्यांच्या पूर्वीच्या प्रदेशांवर ब्रिटीशांनी संपूर्ण ताबा मिळवलेल्या शेवटच्या प्रदेशांपैकी एक होते.
 
===ब्रिटीश राजवट===
 
ब्रिटीश काळात बुरहानपुर जिल्ह्याचा [[मध्य प्रांत आणि वऱ्हाड (ब्रिटिश भारत)|मध्य प्रांत]] (central provinces) मध्ये सामाविष्ट करण्यात आला, तर उर्वरित खान्देशचा [[मुंबई इलाखा|मुंबई प्रांत]] (Bombay Presidency) मध्ये सामाविष्ट केला गेला. खान्देश हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एक जिल्हा होता. १९०६ मध्ये हा जिल्हा पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला जळगाव येथे मुख्यालय असलेल्या पूर्व खानदेशाचे क्षेत्रफळ ११,७७० चौ. किमी. (४,५४४ चौरस मैल) होते, तर धुळे येथे मुख्यालय असलेल्या पश्चिम खानदेशाचे क्षेत्रफळ १४,२४० चौ. किमी.  (५,४९७ चौरस मैल) होते; १९०१ मध्ये त्यांची लोकसंख्या अनुक्रमे ९५७,७२८ आणि ४६९,६५४ एवढी होती.
[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
 
===स्वतंत्र भारत===
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १९५६ मध्ये मराठी-गुजराती द्विभाषिक [[मुंबई राज्य|मुंबई]] (Bombay State) राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य सन १९६० मध्ये भाषिक आधारावर [[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] राज्यांत विभागले गेले.  त्यानंतर खान्देश हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. पुढे पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला. वर्तमान काळात केवळ याच प्रदेशाला (जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना) खान्देश म्हणून ओळखले जाते.
[[चित्र:India_Khandesh_locator_map.svg|इवलेसे|महाराष्ट्रातील खान्देश प्रदेश]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले