"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ६६:
==भूगोल==
===भौगोलिक स्थान===
खान्देश हा मध्य भारतात दख्खनच्या[[दख्खनचे पठार|दख्खन]]<nowiki/>च्या पठाराच्या वायव्य कोपऱ्यावर, [[तापी नदी|तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. हा उत्तरेस [[सातपुडा]] पर्वतरांगांनी, पूर्वेला बेरार ([[वऱ्हाड]]) प्रदेशाने, दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगररांगांनी (महाराष्ट्रातील [[मराठवाडा]] क्षेत्राशी) आणि पश्चिमेकडे [[सह्याद्री|पश्चिम घाटाच्याघाटा]]<nowiki/>च्या उत्तरेकडील पर्वतरांगांनी वेढलेला आहे.
 
भारतातील हा प्रदेश वर्तमान काळात [[महाराष्ट्र]] राज्यातील उत्तरेकडील [[नाशिक विभाग|नाशिक विभागामध्ये]] आहे. ज्यात [[नंदुरबार जिल्हा|नंदुरबार]], [[धुळे जिल्हा|धुळे]], [[जळगाव जिल्हा|जळगाव]] इत्यादी तीन जिल्हे आहेत.
 
===नद्या===
खान्देशचे मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे [[तापी नदी|तापी]] नदी. उर्वरित दख्खनमधील नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्व दिशेने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या]] उपसागराकडे वाहतात, या विपरीत तापी नदी दक्षिण [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातील]] डोंगररांगेत उगम पावून पश्चिमेकडे वाहत जात खंबातच्या आखातात [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] जाऊन भेटते. तापीला खान्देशातून तेरा मुख्य उपनद्या जाऊन मिळतात. यापैकी कोणतीही नदी जलवाहतूक करण्यायोग्य नाही. तापी एका खोल खोऱ्यात वाहते ज्यामुळे भौगोलिकदृष्ट्या तिला सिंचनासाठी वापरणे कठीण झाले आहे. खान्देशचा बहुतांश भाग तापीच्या दक्षिणेला आहे येथे तापीच्या [[गिरणा नदी|गिरणा]], [[बोरी नदी|बोरी]] आणि [[पांझरा नदी|पांझरा]] या तीन विशाल उपनद्या वाहतात. तसेच अति पूर्वेकडील [[मुक्ताईनगर तालुका|मुक्ताईनगर]] तालुक्यात [[पूर्णा नदी|पूर्णा]] ही सुद्धा प्रमुख उपनदी तापीस येऊन भेटते. तापीच्या उत्तरेस असलेल्या जलोदर मैदानामध्ये खानदेशातील काही समृद्ध भूभाग आहेत. ही जमीन [[सातपुडा]] टेकड्यांच्या दिशेने उंचावत जाते. मध्य आणि पूर्वेला काही कमी उंचीच्या टेकड्यांव्यतिरीक्त उर्वरीत भूमी समतल आहे, उत्तर आणि पश्चिमेकडील भूभाग हा हळूहळू खडकाळ डोंगरांमध्ये आणि दाट वनक्षेत्रात परिवर्तीत होत जातो.
 
== भाषा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले