"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ३०:
 
== भाषा ==
खान्देश हा विविध भाषा व बोल्यांनी समृद्ध असलेला प्रदेश असून खान्देशातील प्रत्येक बोलीवर अहिराणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. कारणास्तव, [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]] ही खान्देशातील प्रमुख भाषा मानली जाते. १९७१ च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.
 
खान्देशात मुख्यतः अहिराणी, लेवा गणबोली, तावडी या बोल्या बोलल्या जातात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. [[लेवा बोली]], गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. [[लेवा बोली|लेवा गण बोली]] ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटील समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले