"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
== उद्या ==
 
'''उद्या''' ह्या कादंबरीची गणना [[dystopian fiction]] ह्या साहित्यप्रकारात करता येईल. कथानक नजीकच्या भविष्यकाळातलं आहे. ह्या जगात जागोजागी माणसांवर पाळत ठेवणारे कॅमेरे लावलेले आहेत, तसेच चेहऱ्यावरचे हावभाव टिपणारे संगणक आहेत. सरकारी यंत्रणा आणि (‘भरोसा’, ‘विकास’ अशी नावं मिरवणाऱ्या) जगड्व्याळ खाजगी कंपन्या यांच्यात अनेक पातळ्यांवर साटंलोटं आहे. समाजातलं स्त्रियांचं प्रमाण घटलेलं असल्यामुळे त्यांची ‘शिकार’ करून त्या श्रीमंत वर्गाला पुरवण्याच्या कामी अनेक राजकीय दलं गुंतलेली आहेत. खेड्यांपासून महानगरांपर्यंत अनेक पातळ्यांवर सगळेच समाजघटक ह्या जाळ्यात कसे अडकले आहेत याचं तपशीलवार चित्रण कादंबरीत आलेलं आहे. ह्याला पर्याय म्हणून अहिंसेच्या मार्गाने जाणारं, निसर्गाशी आपुलकीचं नातं राखून जगण्याचा प्रयत्न करणारं ‘चारगाव’ नावाचं एक खेडं (कम्यून) तग धरून आहे. ह्या दोन जगांतील संघर्ष कादंबरीत प्रभावीपणे चित्रित झाला आहे.
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==