"धोलावीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक भर घातली
ओळ २:
 
== जागतिक वारसा==
धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/explained/dholavira-gujarat-unesco-harappa-indus-valley-civilisation-7425543/|title=Explained: What UNESCO heritage site Dholavira tells us about the Indus Valley Civilisation|date=2021-07-28|website=The Indian Express|language=en|access-date=2021-07-28}}</ref>
जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे. सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व आहे.
 
==पुरातत्वीय महत्व==
येथील छोट्या टेकडीवर असलेल्या गढी सदृश्य जागेवर जगत पती जोशी या पुराशास्त्रज्ञाने १९६८ साली प्रथम उत्खनन केले. त्यानंतर रवींद्र सिंग बिष्ट यांनीही येथे संशोधन करून या स्थळाचे तत्कालीन व्यावसायिक व उत्पादक केंद्र म्हणून असलेले तत्कालीन महत्व जगासमोर आणले आहे.
धोलावीरा येथील पुरातत्वीय अवशेषांत मजबूत बांधणीची संरक्षित भिंत असलेली किल्लेसदृश्य जागा, मध्यभागी असलेली वसाहत आणि खालच्या बाजूला असलेली वसाहत या गोष्टी संशोधकांना सापडलेल्या आहेत. भारतीय सभ्यतेची प्राचीनता सांगना-या मोहेंजोदडो, कालीबंगा, राखीगडी या ठिकाणांच्या जोडीने धोलावीरा हे ही महत्वाचे ठिकाण मानले जाते.<ref name=":0" />
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/धोलावीरा" पासून हुडकले