"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'अंताजीची बखर' ह्या त्यांच्या कादंबरीचा गोषवारा दिला.
→‎अंताजीची बखर: मराठी -> मराठा
ओळ २४:
 
== अंताजीची बखर ==
शैली आणि आशयाच्या दृष्टीने '''अंताजीची बखर''' ही त्यांची कादंबरी लक्षणीय ठरते. अठराव्या शतकात राहणाऱ्या ‘अंताजी खरे’ नावाच्या एक पुणेरी ब्राह्मणाने आपल्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग ‘बखरी’च्या स्वरूपात लिहून ठेवले होते, आणि दोन शतकांनंतर हे जीर्णावस्थेतले कागद त्याच्या वंशजांच्या हाती लागतात अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिलेली आहे. तिच्यात वर्णन केलेला काळ १७४० ते १७५७ दरम्यानचा आहे, आणि तिची भाषिक शैली अठराव्या शतकातल्या बखरवाङ्मयाशी मिळतीजुळती आहे. नागपूरकर भोसल्यांच्या बंगालमधल्या स्वाऱ्या आणि मराठीमराठा बारगीरांनी त्यावेळी केलेले अत्याचार, एका सतीचा प्रसंग, १७५६ साली कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये घडलेला काळकोठडीचा प्रसंग, प्लासीची लढाई अशा अनेक ठिकाणी अंताजी जातीने हजर असतो, आणि आपल्या हिशेबी आणि कातडीबचावू स्वभावाला अनुसरून हरप्रसंगी तो नेमके भाष्य करीत जातो, अशी कादंबरीची रूपरेषा आहे.
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==