"धृतराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
#WPWP
 
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:The blind king Dhrtarastra listens as the visionary narrator Sanjaya relates the events of the battle between the Kaurava and the Pandava clans.jpg|इवलेसे|धृतराष्ट्र व संजय]]
'''धृतराष्ट्र''' हा [[अंबिका]] व [[विचित्रवीर्य]] यांचा [[नियोग|नियोगाद्वारे]] जन्मलेला पुत्र होता. कुरू वंश टिकून राहावा यासाठी विचित्रविर्याच्या मृत्यूनंतर पुत्रप्राप्तीसाठी, अंबिका व अंबालिकेची सासू व राजमाता [[सत्यवती]]च्या आदेशानुसार सत्यवतीचा [[कानिन]] पुत्र कृष्णद्वैपायन व्यास अर्थात्‌ [[व्यास_पाराशर|व्यास पाराशर]] म्हणजेच महर्षी व्यास यांच्यामुळे अंबिकेला झालेला हा पुत्र होता. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून तिने भितीने डोळे मिटून घेतले होते, यामुळे तिचा मुलगा धृतराष्ट्र आंधळा जन्मेल अशी भविष्यवाणी व्यासांनी केली होती.
 
धृतराष्ट्र [[पांडु]]चा सावत्र भाऊ होता. तो शंभर [[कौरव|कौरवांचा]] पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव [[गांधारी]] होते. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव [[दुर्योधन]] होते. धृतराष्ट्र हा जन्मत:चा नेत्रहीन असल्याने त्याला हस्तिनापूरचे राज्य मिळू शकले नाही. त्याच्याऐवजी पांडूला हस्तिनापूरचा सम्राट करण्यात आले होते. पुढे शाप मिळाल्यामुळे विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासाला निघून गेला व सिंहासनावर बसण्याचा हक्क धृतराष्ट्राला आपोआपच प्राप्त झाला. मात्र काही वर्षांनंतर पंडूपुत्रांच्या म्हणजेच पांडवांच्या आगमनामुळे दुर्योधनाला हस्तिनापूरचा सम्राट बनविण्याचा हक्क डावलला जाऊ शकतो, हे लक्षात आल्यावर त्याने दुर्योधनाच्या पांडवविरोधातील सर्व कारवायांकडे दुर्लक्ष केले.