"गोपाळ कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (9) using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
[[बाळ गंगाधर टिळक]] आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना [[जहालवाद|जहालवादी]] राजकारण मान्य होते तर गोखलेंनी [[मवाळवाद|मवाळवादाचा]] मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
 
[[इ.स. १९०२]] साली त्यांची निवड केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन [[व्हाईसरॉय]] [[लॉर्ड मिंटो]] यांनी नामदारांना [[इ.स. १९०९|१९०९]] सालच्या [[मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा|मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा]] मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते [[इंग्लंड]] येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून [[भारत|भारतातील]] समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.
 
[[इ.स. १८८९]] मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. १९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. काँग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, [[इ.स. १९०५|१९०५]] रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन [[इ.स. १९०२|१९०२]] पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे [[अर्थतज्ज्ञ]] होते.
ओळ ४९:
संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.
 
गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे. हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती.
 
==सामाजिक सुधारणा==