"विठाबाई नारायणगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
By adding content
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
'''विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर''' (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात [[पंढरपूर]] येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२३६}}</ref>
 
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ येथे आवर्जून येतात.
तमाशासम्राज्ञी...विठा...
तमाशा पंढरीतले एक नावाजलेले नाव म्हणजे 'विठा" हो, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊबापू मांग नारायणगावकर...
सावळ्या रंगाची पण देखणा चेहरा असणारी हि नृत्यांगना आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवायची,नारायणगावकरांचा अभिमान असणा-या विठाने "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" हि लावणी अजरामर तर केलीच पण त्याचबरोबर मुंबईची केळेवाली, रक्तात न्हाली कु-हाड असे अनेक वगनाट्य सादर करुन आपल्या सुंदरतेबरोबर आपला गोड गळा,आपला नृत्याविष्कार व उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले..पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठा गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होती, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठा बाळंत झाली,बाळाची नाळ दगडाने ठेचून विठा पुन्हा स्टेजवर आली, मुलगा झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला लागली,प्रेक्षकांनी हात जोडून सांगितले विठाबाई आराम करा,आमचे पैसे फिटले, अशी हि लोककलावंत होणे नाही...विठाच्या जीवनचरित्राची भूरळ तमाम रसिकांवर पडणे स्वाभाविकच होते, भारत चीन युध्दाच्या समयी आपल्या जवांनाना धीर येण्यासाठी युध्द सीमेवर जाऊन त्यांच मनोरंजन करणारी विठा, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी गेलेल्या विठाला गर्दीत राज कपूरचा धक्का लागतो तेव्हा "ए भाय जरा देखके चलो" म्हणून राज कपूरला हि आवाक करुन सोडणारी विठा, या तमाशा पंढरीची दंतकथा बनून राहिली, मात्र अनेक पुरस्कार प्राप्त झालेली, प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहचलेल्या विठाची आयुष्याची सायंकाळ उपेक्षितच राहीली, एकेकाळी नारायणगाव जत्रेची शान असणा-या विठाला विनम्र अभिवादन!!!🙏🏻🌹
नूतनमनोहर....
 
==नाटक==