"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
 
==कालावधी==
वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि [https://mahilaarogya.blogspot.com/2020/09/blog-post_34.html रजोनिवृत्ती] पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. [[संततिनियमन|संततिनियमनासाठी]] तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (र्‍हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.
 
शरीराचे नैसर्गिक [[ऋतुचक्र]] शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत ''फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज'' असे म्हटले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेअगोदर सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो. पाळी पुढे करायची [[औषधे]] घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे.