"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: करिअर → कारकीर्द (3) using AWB
ओळ ३५:
 
==इंग्रजी शाळेत==
पुढे गोव्यात ‘ॲंग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात करिअरकारकीर्द करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही.
 
इंग्रजी शाळेत असताना सुखटणकरांची ओळख कवी [[बा.भ. बोरकर|बा.भ. बोरकरांशी झाली.]] त्यांच्याकडूनच मुंबईत उच्चशिक्षणाची चांगली सोय असते, असे मोहनदासांना समजले.
ओळ ४२:
मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मोहनदास सुखटणकर १९५० साली मुंबईत आले आणि मुंबईकर झाले त्यांनी त्या वर्षी मॅट्रिकची आणि एस.एस.सी.ची अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
 
गोव्यात त्यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रासाठी पूरक वातावरण कमी होते. परिणामी सुखटणकरांनी मुंबईतच राहून पुढचे करिअरकारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पायावर उभे राहून काम करायचे, म्हणून त्यांनी एक छोटीशी नोकरी केली.
 
वडिलांची पेशंट असलेल्या एका ख्रिश्चन बाईंचे माहीमला तीन गाळे होते. त्या बाई व त्यांची दोन मुले यांच्याबरोबर सुखटणकर तीन वर्षे गुण्यागोविंदाने राहिले.
 
==कॉलेजचे शिक्षण आणि अभिनयाचे करिअरकारकीर्द==
मोहनदास सुखटणकरांनी १९५२ साली मुंबईत चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत सुखटणकरांची [[सुनील दत्त]]शी ओळख झाली.. बी.ए.पर्यंत दोघे वर्गमित्र होते व. वर्गात एकाच बाकडयावर बसायचे.