"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतर: दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎इतर: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५६:
 
==इतर==
संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश
 
श्रीक्षेत्र पंढरपुर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपुर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करुन ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे.
या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत.
 
 
[[इ.स.चे १८ वे शतक|इ.स.च्या १८व्या शतकातील]] [[वारकरी संप्रदाय|वारकरी]]पंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक [[विठ्ठल]]भक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, इ.स. १९९२ साली [[पंढरपूर]] येथून प्रसिद्ध होणार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणार्‍या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी श्री संत महिपती महाराजांचे एक ८३ पानांचे छोटेखानी चरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी ताहराबाद(तालुका राहुरी) येथील श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री. चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.