"आडनाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB
ओळ १६:
[[पाटील]] : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी [[कापूस|कापसाने]] विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलिस पाटील २) मुलकी पाटील. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) कुळवाडी,यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले... उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा. 
 
चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत(गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला.या जहागीर शिवाय शेकडो पिढ्या पासून वारसा ने आलेली जमीन म्हणजेच कुळाने आलेली जमीन जो कसत त्यालाच कुळवाडी म्हणत आणि या कुळवाडी मध्ये ९६ कूळ अस्तिवात होती तीच आजची ९६ कुळी कुळवाडी लोक आहेत. या ९६ कुळांना ९६ वेग वेगळी आडनावे असावीत आणि यातील ज्या कुळाचे जे बलुतेदार आलुते दार होते तेच कुळाची आलुटेदरी बलुतेदारी कायम स्वरुपी शाबूत राहावी म्हणून ब्रिटिश काळात या ऐक ऐका कुळाच्या सर्व आलेतेदार बलुतेदार लोकांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे ज्या कुळाचे जे आलुटेदर कीव बलुतेदार होते त्यांना तशी नावे दिली गेली.आज प्रत्येक जातीत प्रत्येक आडनाव आहे म्हणजे ज्याला आपली जात माहीत आहे त्याने समजावे तो त्या कुलासाठी त्याची सेवा प्रदान करत होता .कारण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पर्यायाने कुळवाडी लोकांच्या कुळाच्या आधारावर चालत होती.पुढे मुस्लीममुस्लिम राजवट आणि ब्रिटिश काळात कुळवड्याच्या या जमिनी देशमुख,देशपांडे,पाटील,कुलकर्णी आणि सावकार यांनी आपल्या नावावर लाटल्या आणि गावच्या मोठ्या जमिनीचा स्वतःच मालक बनले आणि कुळांना जमिनी फक्त कसण्यासाठी दिल्या त्यामुळे कुळवाडी स्वतःच्या जमिनीचाच नामधारी मालक बनले.पुढे स्वातंत्र्यानंतर कूळ कायदा आला आणि बेकायदा मुळ कुळाच्या भरपूर जमिनी फस्त केलेल्या देशमुख,पाटील,कुलकर्णी,इनामदार या सावकारी प्रवृत्तीच्या लोककडून जमीन पूर्वी जे मुळ मालक होते म्हणजे फक्त जमीन कसत होते त्यांना जमिनी परत देण्यात आल्या. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वतःहून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा. 
 
गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुळवाडी लोकांच्या कुळा वर कर आकारणी करतो तो कुलकर्णी जो कुळवाड्याच्या कुळावर आकारणी करतो कूळ+आकारणी= कूळ करणी = कुलकर्णी. कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे यालापण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकण्र्याच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले. 
"https://mr.wikipedia.org/wiki/आडनाव" पासून हुडकले