५९,२८२
संपादने
No edit summary |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
भारताचार्य '''चिंतामण विनायक वैद्य''' (जन्म : कल्याण, १८ ऑक्टोबर, इ.स. १८६१ मृत्यू : कल्याण, २० एप्रिल, इ.स. १९३८) हे [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक - मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.
चिंतामणराव वैद्यांचे वडील विनायकराव हे कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. इ.स. १८८२त एम.ए. आणि १८८४मध्ये एल्एल.बी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे १८९५मध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीनंतर ते १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी
==कार्य==
|