"इतिहासकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Www.shoaibshaikh..in (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ ६:
[[वर्ग:इतिहास]]
[[वर्ग:इतिहासकार| ]]
इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही तथापि ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे. बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले.