"ब्रिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन- अभ्यास करून आपले प्रमेय मांडले आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. या चार राष्ट्रांनी काय करावे हे गोल्डमन सॅकने कधीच सुचवले नाही वा त्यावर भाष्यपण केले नाही. परिणामत: जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी ही चार राष्ट्रं परस्परांजवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक राष्ट्रसमूहच आहे. २००८ साली ह्या चार राष्ट्रांचे पराराष्ट्रमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिक राष्ट्रांना अधिक जवळ येण्याची निकड वाटली नि परिणामी १६ जून २००९ रोजी या चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे भरली.. विशेष गोष्ट अशी की, ब्रिकची चारही राष्टे ही जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या व प्रगतिपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत.
 
जी-२० या राष्ट्रसमूहात ब्रिकचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेललेअसलेले ब्रिकचे स्थान त्याला मिळालेच पाहिजे या दिशेने वाटचाल सुरू केली.. जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या चार राष्ट्रांनी परस्परांतले सहकार्य नि संघटन वाढविण्यावर भर दिला.
 
 
== ब्रिकचे जगातील स्थान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक" पासून हुडकले