"ध्रुपद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎धृपदाचे चार भाग: इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
'''ध्रुपद''', मूलत [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी अभिजात संगीतातील]] एक प्रवाह आहे. ध्रुपद म्हणजे ध्रुव पद. भारतीय़ उपखंडात मध्ययुगापर्यंत ध्रुपदाचा प्रभाव होता. या पद्धतीत -"स्थाय़ी, अन्तरा, सञ्चारी, आभोग" नामक चार 'कलि' वा 'स्तर' असतात. काही वेळेस दोन स्तर ही असू शकतात. रागाच्या शुद्ध स्वरूपास ध्रुपदात महत्त्व आहे. गीतांचा विषय साधारणतः भक्ति वा निसर्गवर्णनपर असतो.
 
'''धृपद''' यालाच ध्रुपद किवा धृवपद असे म्हणले आहे, भारताच्या काळाच्या पूर्वीही ध्रवगायन प्रचारात होते, ध्रवगायनाचा अपभ्रंश ध्रवपद झाला असावा असे म्हणले जाते, या [[भारतीय शास्त्रीय संगीत]]ाच्या प्रकाराचा वैदिक मंत्रांमधील नाद योगावर आधारलेला आहे.{{संदर्भ हवा}} १८ व्या शतकात मागे पडलेली धृपद गायकी चौदाव्या शतकाच्या शेवटी आणि १५ व्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानसिंग आणि त्यांची उत्कृष्ट गायक असलेली पत्नी मृगनयना या उभयतांनी प्रचारात आणली असे म्हणले जाते. अतिशय पुरातन असलेली ही गायन पद्धती बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकिरुद्दीन आणि अल्लाबंदेखान ह्यांनी रजपूत आणि मोगल राजदरबारांमध्ये चालू ठेवली. पुढे ५ शतकांनंतरही म्हणजे १९-२०व्या शतकात धृपद गायकी अस्तित्वात ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी [[डागर बंधू]] (नसीर [[झिया मोहिउद्दीन डागर|मोईउद्दीन डागर]] आणि नसीर [[अमीनुद्दीन डागर]]) ह्यांनी केली.
 
ख्यालगायकीच्या आधीही धृपदगायकी अस्तित्वात होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्रुपद" पासून हुडकले