"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
संदर्भ
ओळ १:
'''जॉर्ज बिल्स शेल्लर''' हे (जन्म: २६ मे १९३३<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://achievement.org/achiever/george-b-schaller-ph-d/|title=George B. Schaller, Ph.D.|website=Academy of Achievement|language=en-US|access-date=2021-05-20}}</ref>) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन [[सस्तन प्राणी|सस्तन]] प्राणीतज्ज्ञ, [[जीवशास्त्रज्ञ]], निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20070924122148/http://www.mnsu.edu/emuseum/information/biography/pqrst/schaller_george.html|title=George Schaller|date=2007-09-24|website=web.archive.org|access-date=2021-05-19}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20061017222513/http://www.hindu.com/mag/2006/10/01/stories/2006100100120500.htm|title=The Hindu : Magazine / Personality : Man of Nature|date=2006-10-17|website=web.archive.org|access-date=2021-05-20}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20071014014343/http://www.nationalgeographic.com/adventure/best-of-adventure-2007/wildlife/george-schaller.html|title=George Schaller: Lifetime Achievement - National Geographic Adventure Magazine|date=2007-10-14|website=web.archive.org|access-date=2021-05-20}}</ref>[[आफ्रिका]], [[आशिया]] आणि [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेत]] वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म [[बर्लिन|बर्लिनमध्ये]] झाला, शेल्लर यांचे लहानपण [[जर्मनी]]<nowiki/>मध्ये गेले पण किशोरवयात ते [[मिसूरी|मिसुरी]]<nowiki/>ला स्थलांतरीत झाले. शेल्लर पॅन्थेरा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्जार कुलातील प्राण्यांविषयीच्या समितीचे अध्यक्ष आहेत. ते ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे ज्येष्ठ संरक्षक आहेत.
==सुरुवातीचे आयुष्य==
शेल्लर यांनी १९५५ मध्ये [[अलास्का]] विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली<ref name=":0" /> आणि १९६२ मध्ये ते पीएचडी मिळविण्यासाठी  [[विस्कॉन्सिन|विस्कॉन्सिन-मॅडिसन]] विद्यापीठात गेले.<ref name=":0" /> १९६२  ते १९६३ या काळात  ते [[स्टॅनफर्ड विद्यापीठ|स्टॅनफर्ड]] विद्यापीठाच्या वर्तणूक विज्ञान विभागात फेलो होते.<ref name=":0" /> १९६३ ते १९६६ पर्यंत, शेल्लर यांनी [[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ|जॉन्स हॉपकिन्स]] विद्यापीठाच्या पॅथोबायोलॉजी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले.आणि १९६६ ते १९७२ या काळात रॉकफेलर विद्यापीठात आणि न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीमध्ये संशोधन व प्राण्यांचे वर्तन या क्षेत्रात सहाय्यक संशोधक म्हणून काम केले. १९७२ ते १९७९ या काळात त्यांनी सेंटर फॉर फिल्ड बायोलॉजी अँड कन्झर्व्हेशनमध्ये समन्वयक म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९८८ या काळात  न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन कार्यक्रमाचे संचालक म्हणून काम पाहिले.
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]