"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४९:
* [[हवामान]] व पर्जन्यविचार, इत्यादी.
 
==[[तिथी]]==
[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला [[तिथी]] म्हणतात. [[तिथी]]चा संबंध हा धार्मिक कृत्याशी लावला गेला आहे.
 
===[[तिथी]]चातिथीचा क्षय व वृद्धी===
पंचांगात एखादी [[तिथी]] पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या [[तिथी]] कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी [[तिथी]] असते ती त्या दिवसाची [[तिथी]]म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी [[तिथी]] सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या [[तिथी]]चा [[क्षय]] झाला असे समजतात. [[तिथी]]चा क्षय म्हणजे ती [[तिथI]] आलीच नाही असा होत नाही. प्रत्येक [[तिथी]] १९ ते २६ तासांकरता येतेच. (तिथिलोपाचे उदाहरण : रविवारी ६:३२ ला सूर्योदय. तेव्हा नवमी आहे, म्हणून त्या पूर्ण दिवसाची नवमीशी सांगड. मग ६:५० ला दशमी सुरू होते, आणि ती सोमवारी पहाटे ५:१० ला संपून एकादशी सुरू होते. सोमवारी ६:३४ ला सूर्योदय होतो, तेव्हा एकादशी. अशा प्रकारे दशमीचा क्षय वा लोप होतो.) तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू असलेली [[तिथी]] दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती [[तिथी]] पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते. वृद्धीचे उदाहरण : रविवारी पहाटे ५:४२ अष्टमीची सुरुवात, आणि ६:०८ चा सूर्योदय. सोमवारी ६:०९ चा सूर्योदय, तेव्हा अष्टमी, म्हणून त्या पूर्ण दिवसाची सागड परत अष्टमीशीच. सोमवारी सूर्योदयानंतर ७:१५ ला अष्टमी समाप्त. म्हणजे अष्टमी लागोपाठ दोन दिवस आली, म्हणजे तिची वृद्धी झाली. चन्द्राच्या पृथ्वीपासून कमी-अधिक अन्तरानुसार केपलरच्या सूत्रानुसार (Kepler's Law) तिथीचा काल १९ ते २६ तास असल्यामुळे या घटना घडतात. एका रोमन तारखेला तीन तिथ्या येऊ शकतात, अनेकदा येतात. आणि एका [[तिथी]]ला तीन तारखा शक्य असतात, आणि अनेकदा हा प्रकारही होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले