"झक मारणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
झक मारणे नवीन पान निर्माण केले
(काही फरक नाही)

१७:१०, २९ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

झक मारणे हा मराठी भाषेत नेहमीच्या वापरात असणारा शब्द असून तो असभ्य मानला जातो. त्याचा अर्थ 'वेळ वाया घालविणे', असा केला जातो. हा मूळ 'झक्' असा असून वाक्प्रचारात 'झक' असा होतो.[१]

अर्थ

'झक्' चा अर्थ संस्कृत भाषेतील 'झष' म्हणजे मासा, याच्याशी जोडला जातो. आणि मासे मारणे असे गृहीत धरून त्याचा अर्थ 'निरर्थक उद्योग करणे, असा केला जातो, ही एक मोठी चूक असून 'मासा' हा शब्द पुल्लिंगी आहे आणि मासे मारणे हा उपजीविकेचा उद्योग आहे, असे मत संपादक - अभ्यासक अ. द. मराठे यांनी व्यक्त केले आहे.[१]

  1. ^ a b मराठे, अश्विनीकुमार दत्तात्रेय (०१ मार्च २०१२). मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार. मुंबई: ग्रंथाली प्रकाशन, मुंबई २८. pp. ०४. ISBN ग्रंथाली प्रकाशन क्रमांक ४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य). |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)