"विलास वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ ६:
प्रा. वाघ ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील मोराणे येथे झाला. प्रा. वाघ ह्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण अशा कुटुंबाचे पालनपोषण त्यांच्या आईने कष्टपूर्वक केले.{{Sfn|कसबे|२०१५}} गरिबीमुळे धुळे येथील हरिजन सेवा संघाच्या राजेंद्र छात्रालय ह्या वसतीगृहात त्यांना शिक्षणासाठी ठेवण्यात आले. त्यांचे शालेय शिक्षण उशिरा म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी सुरू झाले. {{Sfn|कसबे|२०१५}} पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानविषयातील पदवी प्राप्त केली. {{Sfn|कांदळकर|२०२१}} {{Sfn|कसबे|२०१५}}
 
पदवी प्राप्त केल्यानंतर वाघ ह्यांनी काही काळ कोकणातील नरडावणे येथे शालेय शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर १९८१पर्यंत पुणे येथील अशोक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुणे येथील भारतीय शिक्षणसंस्थेत त्यांनी प्रौढशिक्षण विभागात काही काळ काम केले. तसेच पुणे विद्यापीठात प्रौढशिक्षण विभागात चार वर्षे काम केले. त्यानंतरविद्यापीठात काम करत असतानाच तेथे गणिताच्या प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या उषाताई कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सामाजिक कार्य करत असताना जातिनिर्मूलनाचा एक मार्ग म्हणून आंतरजातीय विवाह होणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत असल्याने त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.{{Sfn|कसबे|२०१५}} नंतरच्या काळात त्यांनी आपल्या पत्नी उषाताई वाघ ह्यांच्यासह सामाजिक कार्यात सक्रिय होण्यासाठी विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा दिला. {{Sfn|कसबे|२०१५}}
 
==सामाजिक कार्यातील सहभाग==
 
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विलास_वाघ" पासून हुडकले