"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६,०५३ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
'''[[कुरंग हरीण]]''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
 
हरीण, हा प्राणी सस्तन वर्गापैकी एक आहे. तसेच यांच्या पायांवरील खुरांची संख्या सारखी असते. म्हणून त्यांचा समावेश [[गवयाद्य]] कुळातील [[युग्मखुरी]] या गणात झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या हरणांमध्ये वातावरणानुसार किंवा तेथील हवामानानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल झाल्याचे दिसतात. तसे पाहता हरणे हे घनदाट अरण्य, जंगल, वाळवंटी प्रदेश, दलदलीचा प्रदेश, मैदानी प्रदेश व पर्वतांच्या उतरणीवरसुद्धा दिसून येतात. यांच्यामध्येसुद्धा फरक दिसून येतो. आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात हरणे आढळून येतात. तसेच दक्षिणी आशियात सर्वत्र त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार असल्याचा दिसून येते. हरणांच्या एकूण ३१ प्रजातींमध्ये शंभर जाती समाविष्ट आहे. वातावरणामुळे त्यांच्यात आकार, आकारमान, हालचाल, आहार या गोष्टींमध्ये अनुकूल बदल म्हणजे दिसून येतो. हरणी दिसायला देखणी असून ते अत्यंत वेगवान आहेत.
 
हरणांच्या सर्व जातीमध्ये नरांना शिंगे असतात. तसेच काही जातींच्या माद्यांनाही शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे ही पातळ असतात आणि नरांच्या शिंगापेक्षा लहान सुद्धा असतात.  चिंकारा या हरणांच्या जातीतील प्राण्यांना इंग्लिश मध्ये अँटिलोप ऐवजी गॅझेल म्हणतात. या हरणांची शिंगे एकदा उगवली की मरेपर्यंत कायम राहतात. कस्तुरी मृगाच्या जातीच्या हरणामध्ये मात्र शिंगे गळून पडतात. चिंकारा या हरणांच्या शिंगांना शाखा नसून, ती लांब व सरळ वक्र सारखी पिळदार कोयता किंवा विळ्याच्या आकाराची-सारंगीच्या आकाराची असून ती पोकळ असतात. मात्र एकट्या चौशिंगाचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या हरणांमध्ये शिंगांची एकच जोडी डोक्यावर असते. चौथीच्या हरणांच्या जातीमध्ये त्यांच्या डोक्यावर दोन शिंगांच्या जोड्या असतात.
 
हरणी सहसा कळपाने राहतात. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात. कळपामध्ये थोड्या संख्येपासून ते दहा हजारपर्यंत प्राणी असतात. त्यांचे चेहरे गाय व शेळी-मेंढी सारखे दिसतात. त्यांचे कान लंबाकृती असतात. ही शाकाहारी असून झुडपांची शेंडी फांद्या आणि गवत खातात. त्यांचे पोट चार कप्प्यांचे असून ते रवंथ करण्यास योग्य असते. त्यांचे पाय लांब असतात. मादीमध्ये स्तनाच्या दोन जोड्या असतात. हरणांचे रंग निसर्गाशी मिळतेजुळते असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात रंग अधिक गडद तर उन्हाळ्यात तो फिका पडतो. हरणाच्या ग्रंथीतील द्रवाला गंध नसतो. हरणामध्ये दातांची संख्या बत्तीस असते. तसेच काही जातींमध्ये प्रजनन काळ ठरावीक नसतो तर काहींमध्ये हा ठरावीक असतो.
 
हरणांचा गर्भ कालावधी १६८ ते २७७ दिवसाचा असून एकावेळी मादीला बहुधा एकच पिल्लू होते, क्वचित दोन. हरणांमध्ये वयात येण्याचा कालावधी सुद्धा त्यांच्या जातींवर अवलंबून असतो.
 
==संदर्भ==
५,२२५

संपादने