"ताराबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५ बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Adding Birth date)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
{{बदल}}
[[चित्र:Maharani Tarabai of Karvir.jpg|अल्ट=महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.|इवलेसे|महादेव विश्वनाथ धुरंधर यांनी काढलेले महाराणी ताराबाई यांचे चित्र, सन १९२७.]]
महाराणी '''ताराबाई''' (१४ एप्रिल १६७५-१७६१) ह्या [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांच्या कन्या होत्या.महाराणी ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८० च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
 
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून [[चौथाई आणि सरदेशमुखी]] गोळा करून आर्थिक बळ वाढवले.
२,६७०

संपादने