"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३८ बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकडपर्यंतच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. '''सरसेनापती हंबीररारावांच्या तलवारीची कमाल''' या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावरती सात नाॅचेस आहेत, ते हंबीरारावांनी केलेल्या पराक्रमाच्या निशाण्या आहेत.)
 
हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हंबीरराव मात्र नंतर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.
संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचंड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानंतर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले. या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ केंजळगडच्या पायथ्याशी झाली. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतु किल्लेदार पिलाजी गोळे अन इतर मावळ्यांना (तंबूत नियोजन सुरू असताना) त्यांच्यावर जाणारा तोच तोफेचा गोळा स्वतःच्या अंगावर झेलून, लागून ते धारातीर्थी पडले.
 
या हंबीरराव मोहिते यांची समाधी कृष्णा नदीच्या काठावर कोठेतरी [[कऱ्हाडवाई]] तालुक्यातील तळबीडतालुक्यात (जिल्हा सातारा) येथे आहे.
 
== केतकर ज्ञानकोशातील माहिती==
२,६७०

संपादने