"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB
छो →‎राजकीय पार्श्वभूमी: शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
ओळ ७०:
जनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी [[हुंडाबंदी]], सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, [[हरितक्रांती]], पर्यावरण या सर्वच क्षेत्रांत अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन गेले. कॉंग्रेसचे आमदार म्हणून कै. किसनराव सांगळे यांची कारकीर्दही गाजली पण, खऱ्या अर्थाने गाजला तो सुबोध केशव सावजी यांचा कार्यकाळ. सलग १४ वर्षे ते आमदार होते. काही काळ ते महसूल, वस्त्रोद्योग आदी खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मेहकरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना (कोराडी प्रकल्पातून) मंजूर झाली. मेहकरातील बरीच विकासकामे त्यांच्या हातून झाली. या सर्व कालखंडात डॉ. पळसोकर, डॉ. देशमुख, माणिकचंद जैन, नलिनीताई खडसे, शोभाताई अग्रवाल या नगराध्यक्षांनी लक्षात राहण्याजोगे काम केले.
 
नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे कॉंग्रेसचे वर्चस्व संपले आणि १९९५ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. युतीच्या काळात युवक कल्याण पाटबंधारे खात्याचे ते राज्यमंत्री झाले. सध्या ते बुलढाण्याचे खासदार आहेत. मेहकरसाठी त्यांनी रस्ते, नालीबांधणी, वीज, पाणी आदी बाबींकरिता पैसा खेचून आणला. नगराध्यक्ष म्हणून जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची कारकिर्दकारकीर्द नियोजनबद्ध विकास कामांच्या बाबतीत लक्षणीयच ठरली. एकात्मिक शहर विकास योजनेचा आराखडा त्यांच्या काळातच तयार होऊन शासनाकडे गेला. त्यातील एकेक काम नंतरच्या काळात होत आहे. रामराव म्हस्के, कासमभाई गवळी, संजय जाधव या नगराध्यक्षांनीही रस्ते विकासाच्या बाबतीत काम केले. सामाजिक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्य केलेले डॉ. संजय रायमूलकर सध्या शिवसेनेचे आमदार आहेत.
 
शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ आहेत. [[चिखली]], बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगीचा नाही. जागा मात्र बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगिचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेहकर" पासून हुडकले