"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
ओळ ५:
== सुरवातीची वर्षे ==
 
माणेकशॉ यांचा जन्म [[पंजाब|पंजाबमधील]] [[अमृतसर]] येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे [[वलसाड]] [[गुजरात]] येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण [[नैनिताल]] येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या [[भारतीय मिलिटरी ऍकॅडमी]] मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची [[सेकंड लेफ्टनंट]] पदी नियुक्ती झाली.
 
माणेकशॉनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकिर्दकारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. [[जपान]] बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.
 
== ब्रिटीश भारतीय लष्कर व दुसरे महायुद्ध ==
ओळ १३:
 
== १९७१ चे भारत-पाक युद्ध ==
७ जून १९६९ रोजी त्यांनी [[जनरल कुमारमंगलम]] यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.
 
*१९७१च्या भारत-पाक युद्धानंतर घडलेला एक किस्सा
 
१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लीम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला.