"गर्भारपण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख गर्भारपणा वरुन गर्भारपण ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[चित्र:PregnantWoman.jpg|right|thumb|गरोदर स्त्री]]
 
स्त्रीच्या [[गर्भाशय|गर्भाशयातील]] [[फलन]] व [[भ्रूण]] किंवा [[गर्भ]] म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपणागरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक [[सगर्भता]] असू शकतात. [[गर्भधारणा|गर्भधारणेनंतर]] सुमारे ३८ आठवड्यांत [[प्रसूती]] होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे ४० आठवडे इतका येतो. सस्तनी प्राण्यांच्या गर्भावस्थांपैकी मानवी गर्भावस्थेचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे. गर्भधारणा लैंगिक समागमातून किंवा [[सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञान|सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञानामार्फत]] साधली जाऊ शकते.
 
गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे [[भ्रूण]] होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते.<ref>भ्रूणाची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=3225</ref><ref>गर्भाची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=3424</ref> प्रसवपूर्व विकासाच्या विविध अवस्थांचा निर्देश सुलभ व्हावा म्हणून मानवी गर्भावस्था तीन तिमाहींच्या कालावधीत विभागली जाते. पहिल्या तिमाहीत [[गर्भस्राव]] (भ्रूणाचा किंवा गर्भाचा नैसर्गिक मृत्यू) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुसऱ्या तिमाहीत गर्भाची वाढ सहजगत्या पाहिली जाऊ शकते. तिसऱ्या तिमाहीचा प्रारंभ हा जवळपास [[जीवनक्षमता|जीवनक्षमतेचा]], अर्थात वैद्यकीय मदतीसह किंवा मदतीशिवाय गर्भाशयाबाहेर गर्भ जगू शकण्याच्या क्षमतेचा बिंदू असतो.<ref>तिमाहीची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=11446</ref>
ओळ ३१:
गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू, मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत गर्भाच्या अभिसरणसंस्था, चेतासंस्था, पचनसंस्था, आणि वृक्क व उत्सर्जन संस्था विकसित झालेल्या असतात. सर्व महत्त्वाच्या अवयव विकसित होतात.
 
* <big>५ आठवडे</big>- पहिल्या पाच आठवड्यात भ्रूण तयार होऊन त्यात बदल होतात. भ्रूण एकपेशीयकडून बहुपेशीय प्रकाराकडे रुपांतरितरूपांतरित होत असतो.
* <big>७ आठवडे</big>- गर्भामध्ये बदल होऊन हृदय सुरू होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासून इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.
* <big>१२ आठवडे</big>- हाडांची निर्मिती सुरू होते.
 
'''गर्भचाचण्या''': गर्भवती महिलेच्या मूत्रामध्ये एचसीजी आढळते. बहुतेक तयार गर्भचाचणी संचामध्ये एचसीजी चाचणीवरून गर्भ राहिल्याचे निदान करण्यात येते. आजपर्यंतच्या अभ्यासावरून ५० ते ७०% गर्भाच्या चेतासंस्थेमधील दोष गर्भवती महिलेस फॉलिक ॲसिड (बी9 जीवनसत्व) दिल्यास दूर होतात असे आढळून आले आहे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या महिलेस दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक ॲसिडची मात्रा पुरेशी आहे. क्षकिरण चिकित्सा, काहीं औषधे, आणि प्रदूषके यांचा पहिल्या तिमाहीमध्ये गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे क्षकिरण चिकित्सा टाळतात. वैद्यकीय अधिकार्‍यानाअधिकाऱ्यांना गर्भवती स्त्री घेत असलेल्या औषधांची पूर्ण माहिती दिली असेल तर व त्यांनी. गर्भजलचिकित्सा आणि अल्ट्रासाउंड करायचा सल्ला दिल्यास ह्या चाचण्या खात्रीलायक केंद्रामधून करून घेणे हितावह असते. बाराव्या आठवड्यापर्यंतच्या गर्भाचे लिंग अल्ट्रासाउंड चाचणीमधून कळते. पण अशी गर्भलिंग चिकित्सा करण्यास कायद्याने बंदी आहे.
 
=== दुसरी तिमाही ===
[[चित्र:Month 5.svg|100px|right|thumb|गर्भावस्थेतील दुसऱ्या काळात गर्भाशयाची स्थिती]]
दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हातानेहाताला जाणवता येऊ शकतेजाणवते. बाळाची वाढ व हालचाल सुरुसुरू राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची [[इन्सुलिन]] तयार करण्याची प्रक्रिया सुरुसुरू होते. गर्भ मुत्रविसर्जनमूत्रविसर्जन करते. की जेहे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात [[जननेंद्रिय]] तयार होतहोते आणि हे भ्रूण स्त्री-पुरुष म्हणून ओळखले जाऊ शकते.
 
गर्भावस्थेची दुसरी तिमाही १३ ते २७ आठवड्यांची असते. या कालावधिमध्येकालावधीमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. अपरा पूर्णपणे विकसित झालेली असते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे.
 
१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरू होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरू होतात. या गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यातील ताण व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.
 
=== तिसरी तिमाही ===
तिसरा काळ हा टळलेल्या पाळी पासूनपाळीपासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो. २८व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, वृक्क, आणि फुफ्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो.. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास ३०००-३६०० ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो.
 
गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ झपाट्याझपाट्याने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स (vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. माता जे सेवन करेल ते नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.
 
शेवटच्या [[मासिक पाळी]]नंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.
 
== लक्षणे ==
'''मातेमधील बदल'''- पहिल्या तीन महिन्यामध्ये मातेच्या शरीरात गर्भधारण करण्याच्या दृष्टीने बदल होतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे मळमळ, उलट्या आणि मूड बदल. स्तनांचा आकार बदलणे, स्तनांचा कडकपणा बदलून ते मऊ होणे , थकवा जाणवणे, काहीं पदार्थ खाण्याची इच्छा होणे. गर्भधारणेनंतर पहिल्या काहीं आठवड्यात स्तनाग्रांच्या भोवतालची जागा काळवंडते. दुसऱ्या तिमाहीमध्ये मातेमध्ये उत्साह वाढतो. गर्भाचा आकार वीसपटीनी मोठा होतो. १९-२०व्या आठवड्यात मातेस गर्भाची हालचाल जाणवते. या काळात मातांनी सैल कपडे वापराणे योग्य असते. तिसऱ्या तिमाहीमध्ये मातेचे पोट खाली उतरते.
 
== गर्भार स्त्रीचा अपेक्षित आहार व व्यवहार ==
ओळ ६८:
* रक्तातील [[हिमोग्लोबिन]]चे प्रमाण.
* रक्तातील [[पांढऱ्या रक्त पेशी]]चे प्रमाण.
* [[एच.आय.व्ही.]] ची तपासणी.
* [[व्ही.डी.आर.एल.]] ची तपासणी.
* रक्तातील साखरेची तपासणी.
* [[टॉर्च तपासणी]]
ओळ ८०:
 
=== [[सोनोग्राफी]] ===
[[सोनोग्राफी]]च्या तपासणीतून बाळाची वाढ, गर्भजल प्रमाण, गर्भातील व्यंग याची तपासणी केली जातेकरतात. गर्भाच्या डोक्याचा घेर, मांडीच्या हाडाची लांबी, पोटाचा परीघ यांच्या येणाऱ्या संख्येच्या आधारे बाळाची वाढ आठवड्यांत ठरविली जातेठरवतात. बाळाच्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास करून अवयवांतील व्यंग तपासले जाताततपासतात.
[[चित्र:Ecografías.14 semanas.jpg|600px]]
 
ओळ ८७:
== जन्म ==
[[चित्र:HumanNewborn.JPG|thumb|right|300px|नवजात बालक]]
[[स्त्री]]ची [[गर्भावस्था]] संपून बालकाचा/बालकांचा [[जन्म]] होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. नैसर्गिक प्रसूती योनी मार्गातून होते परंतु ज्यावेळी ती शक्य नसते त्यावेळी पोटावर ऑपरेशन करून बाळाची प्रसूती केली जाते या [[सिझेरियन सेक्शन ऑपरेशन]] म्हणतात. ज्युलियस सीझर राजाचा जन्म या प्रकारे झाला होता.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भारपण" पासून हुडकले