"एव्हरेस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो तेनसिंग नोर्गे यांच्याविषयी संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
तेनसिंग नोर्गे यांच्याविषयी आणखी थोडासा संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ९३:
[[चित्र:Tenzing Norgay.jpg|thumb|right|200 px|शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचे छायाचित्र]]
 
१९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्‍न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा [[तेनसिंग नोर्गे]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kheliyad.com/edmundtiger-hillaryof-firstthe-onsnows-tenzing-everestnorgay/|title=Edmund Hillary : First on Everest|date=2020-08-05|website=kheliyad|language=en-US|url-status=live|access-date=2021-03-28}}</ref> व न्यूझीलंडचे [[एडमंड हिलरी]] या जोडीला झाला. दोनच दिवसांनी [[तेनसिंग नोर्गे|नोर्गे]] व [[एडमंड हिलरी|हिलरी]] या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.<ref>[[Tenzing Norgay]] and [[James Ramsey Ullman]], ''Man of Everest'' (1955, also published as ''Tiger of the Snows'')</ref>. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाऊन आनंद साजरा केला.
 
एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यूझीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.