"पोपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट जोडला
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन
No edit summary
ओळ २१:
 
पिकाची व फळांची नासाडी करणारा पक्षी म्हणून माणसाने यांची बेसुमार हत्या केल्यामुळे पोपटांच्या कित्येक जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही त्या वाटेवर आहेत. मॅस्करीन आणि त्याच्या जवळपासच्या इतर बेटांवर आज एकही पोपट शिल्लक नाही. अमेरीकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य भागात एके काळी विपुल असणारा कॅरोलायना पोपट विसाव्या शतकात पूर्णपणे लोप पावला आहे. भारतातील जाती : भारतात पोपटांच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी तीन सर्वत्र आढळणाऱ्या असून बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशांपुरत्याचा मर्यादित आहेत.राघू : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. दाट पाने असलेले मोठाले वृक्ष जेथे असतील अशा सर्व प्रकारच्या प्रदेशांत हा राहतो. मनुष्यवस्तीतली मोठाली झाडे, बागा, आणि आसपासची शेते यांत तो वरचेवर येतो. साधारणपणे कबुतराएवढा हा असतो; रंग वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा; चोच लाल, आखूड, मजबूत आणि वाकडी; डोके मोठे; मानेच्या भोवती गुलाबी कडे असून पुढच्या बाजूला ते काळ्या पट्ट्याने चोचीच्या बुडाला जोडलेले असते; खांद्यावर तांबडा पट्टा; शेपूट लांब व टोकदार; मादीच्या मानेभोवती गुलाबी वलय नसते.यांची लहान लहान टोळकी किंवा मोठाले थवे असतात.ते उभ्या पिकांवर व फळबागेतील फळांवर हल्ला चढवून त्याची खाण्यापेक्षा नासधूसच जास्त करतात. धान्य किंवा फळे खात असताना मधून मधून ओरडून ते गोंगाट करीत असतात. यांचे उडणे जलद व डौलदार असते. ठराविक झाडीमध्ये रात्री झोपण्याकरिता यांचे थवे गोळा होतात व गोंगाट करीत करीत तेथे झोपी जातात. पुष्कळ लोक पिंजऱ्यात राघू बाळगतात व त्यांना बोलायला शिकवितात. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ डिसेंबर ते एप्रिल असतो.कीर : या पोपटाच्या आवाजावरून त्याला कीर असे नाव दिले असावे असे दिसते. याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला क्रॅमरी असे आहे. मैदानी प्रदेशात व डोंगरांवर १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो. विरळ जंगलांत, शेतांत, त्याचप्रमाणे गावांत व खेड्यांत हा नेहमी आढळत असल्यामुळे हा सगळ्यांच्या माहितीचा आहे.सांळुकीपेक्षा हा मोठा असतो. राघूची ही लहान आवृत्ती असते, असे म्हणावयास हरकत नाही; परंतू याच्याखांद्यावर राघूप्रमाणे तांबडा पट्टा नसतो; मादीच्या मानेभोवती नराप्रमाणे गुलाबी काळे वलय नसते. सामान्यतः हा झाडावर असतो; पणपण कधीकधी भक्ष्य मिळवण्याकरिता तो जमिनीवर उतरतो. राघूप्रमाणेच यांचे थवे असतात व ते शेतांत व बागांत नासधूस करतात. राघूप्रमाणेच यांचे थवे दाट झाडीमधील ठराविक झाडांवर रात्री झोप घेतात. उडताना किंवा बसला असताना हा कर्कश आवाज काढीत असतो.पुष्कळ लोक हा बाळगतात. हा बोलायला शिकतो; त्याचप्रमाणे कसरतीचे बरेचसे खेळ, बंदूक उडविणे, मशाल वाटोळी फिरविणे वैगेरे खेळ त्याला शिकविले, तर तो ते करून दाखवतो. प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत असतो.तोता : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हा मुख्यतः अरण्यात राहणारा असला, तरी लागवडीखाली असलेल्या झाडीच्या प्रदेशातही हा आढळतो. हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. तोता साळुंकीएवढा असतो. बांधा सडपातळ व शेपटी लांब, टोकदार असते; नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे; मानेभोवती हनुवटीपासून निघालेले बारीक काळे वलय;खांद्यावर मोठा तांबडा डाग; शेपटीची मधली पिसे निळी व त्यांची टोके पांढरी; मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा; मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय; खांद्यावर तांबडा डाग नसतो. चोच शेंदरी रंगाची असते.दाट जंगलात यांचे थवे आढळतात. बी व रानफळे हे यांचे मुख्य खाद्य होय. राघू किंवा कीर यांच्यापेक्षा हा जास्त वेगाने उडतो. याचा आवाज ‘ट्युई ट्युई’असा काहीसा असून मंजूळ असतो. इतर पोपटांप्रमाणे हा पिंजऱ्यातून बाळगीत नाहीत.यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत असतो.संदर्भ : Boosey. E. J. Parrots, Cockatoos and Macaws, New York, 1956.
 
कर्वे, ज. नी.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)
 
* More
 
 
[https://www.intomarathi.in/2021/03/parrot-information-in-marathi.html Parrot information in marathi]
 
[https://www.intomarathi.in/2021/03/parrot-information-in-marathi.html पोपटविषयी माहिती मराठी]
 
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Psittacula krameri|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.indianringneck.com/|इंडियन रिंगनेक.कॉम - भारतीय पोपटांविषयी माहिती|इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://natureali.org/roserings.htm|कॅलिफोर्नियन पोपटांविषयी माहिती|इंग्लिश}}
 
* [https://www.intomarathi.in/2021/03/parrot-information-in-marathi.html Parrot information in marathi]
 
* [https://www.intomarathi.in/2021/03/parrot-information-in-marathi.html पोपटविषयी माहिती मराठी]
 
[[वर्ग:पक्षी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोपट" पासून हुडकले