"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: बॅंकिंग → बँकिंग using AWB
ओळ १:
 
{{पुनर्लेखन}}
'''मेहकर''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [[बुलढाणा]] जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील [[पैनगंगा|नदी पैनगंगा]] वाहते.मेहकरचे जागतीक भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतीक दर्जाची भूषणास्पद आहेत.(१) येथील बालाजींची मूर्ती. (२) जगप्रसिध्द एकादश नरसिंहातील सहावा नरसिंह व मंदिर येथे आहे।.(३) संतश्री बाळाभाऊ महाराज पितळे, ज्यांचा शिष्य वर्ग भारत व भारताबाहेर पसरलेला असून त्यांचे चरित्र दिव्य व बोधप्रद आहे.
Line ८ ⟶ ७:
 
संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे
 
 
 
मेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे विद्यमान गुरुपीठाधिश ॲड.रंगनाथ महाराज पितळे (बाबासाहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक,पारंपरिक, सामाजिक कार्यक्रम होतात.
Line ६० ⟶ ५७:
 
==इतिहास आणि धार्मिक स्थाने==
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. [[महानुभाव पंथ]]ाचे भगवान [[चक्रधरस्वामीं]]चा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वसिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत.
 
मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते. [[पेंढारी]] लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध [[शिवाजी]]राजाचे आजोळ व [[जिजाबाई]]चे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले [[लोणार]] ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. [[श्रीमद्भगवद्गीता | श्रीमद्भगवद्गीतेच्या]] अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकर]]ांनी अन्नछत्र बांधून दिले होते.
 
मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या ६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत. मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते. या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २ फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर पाण्यात बुडून जाते.
Line ८१ ⟶ ७८:
ना.घं. देशपांडे यांनी मेहकरात मेहकर एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय व कन्या विद्यालय आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय व कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली.डॉ. राम शिंदे यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगली वाटचाल सुरू केली आहे,अध्यापक विद्यालय, पॉलिटेक्निक, CBSE पब्लिक स्कूल या संस्थाही त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली. संतांजी कॉन्व्हेंट, ज्ञानदीप कॉन्व्हेंट या इंग्रजी शाळा लक्षणीय कार्य शैक्षणिक क्षेत्रात करीत आहेत. कासमभाई गवळी यांनी उर्दू विद्यार्थ्यांसाठी उर्दू विद्यालय सुरू केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मेहकरची घोडदौड नजरेत भरण्यासारखी आहे.
 
बॅंकिंगबँकिंग क्षेत्रात शहर मागे नाही. जीवन गतिमान झाले व लोकांच्या अपेक्षा गरजा वाढल्या. राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांबरोबरच सहकारी बॅंकांनीही व्यवहार वाढवले. श्याम उमाळकरांची सत्यजित पतसंस्था, डॉ. सुभाष लोहिया, उदय सोनी, आदींच्या प्रयत्नातून विस्तारलेली महेश पतसंस्था, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पतसंस्था, वसंतराव मगर, सर्पमित्र वनिता बोराडे, नलिनी खडसे यांच्या विविध पतसंस्था या अर्थविषयक संस्थांच्या जाळ्याने बचत व कर्जपुरवठा गरजा भागल्या व त्याबरोबरच शहराच्या व्यापार, रोजगारसंबंधीच्या भरभराटीला मोठा हातभार लागला. रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या उसाला किंमत देण्याचे काम प्रतापराव जाधव, भगवान मानधने, बबनराव भोसले, प्रकाश मापारी, विलास काळे आदींच्या प्रयत्नातून साकारलेल्या शारंगधर साखर कारखान्यानेही केले आहे. मेहकर परिसरातला हा एकमेव मोठा उद्योग. एरव्ही अनेक वर्षांपासून मेहकरला अनेक एकरांच्या पडीत जमिनीवर फक्त एम.आय.डी.सी.चा बोर्डच तेवढा उभा आहे. औद्योगिक वसाहत उभीच झाली नाही. गावात मोठमोठी व्यापार प्रतिष्ठाने, व्यापारी संकुलात वाढ झाली पण, मोठ्या रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.
 
पूर्वी बालाजी संस्थानमध्ये धर्मार्थ दवाखाना वैद्यांच्या सहकार्याने चालवला जायचा. वार्षिक तीन रुपये भरून वर्षभर मोफत औषधोपचार केला जायचा. आता मेहकरात ग्रामीण रुग्णालय आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांचे ४७ दवाखाने आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. १९१६ मध्ये मानमोडीच्या (एन्फ्लुएंझा) रोगाने येथील शेकडो लोक दगावले. १९२० मधील दुष्काळात उपासमार झाली. १९२६ मध्ये प्लेगने असंख्य बळी घेतले. २ जातीय दंगली झाल्या तरीही होरपळलेली माणसे पुन्हा उभी झाली व गावाला प्रगतीची गती देत राहिली. कालानुरूप सर्व परिवर्तनाचा स्वीकार करत मेहकर ताठ मानेने उभे आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेहकर" पासून हुडकले