"नृसिंह सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
 
महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली.
 
नृसिंह सरस्वती [[इ.स. १३८८]] ते [[इ.स. १४२१|१४२१]] या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी (इ. स. १४२१), इ. स. १४२२ ते १४३४ या काळात [[नरसोबावाडी|नरसोबावाडीत]] व इ. स. १४३५ ते १४५८ या काळात [[गाणगापूर]] येथे राहिले. 'गुरुचरित्र' हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरूचरित्राच्या ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे.
 
नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नृसिंहसरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीनवन दिले.
 
==नृसिंह सरस्वतींची शिष्यपरंपरा==
#) माधव सरस्वती
#) बाळसरस्वती
#) कृष्णसरस्वती
#) उपेंद्र माधव सरस्वती
#) सदानंद सरस्वती
#) ज्ञानज्योति सरस्वती
#) सिद्ध सरस्वती
 
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:इ.स. १३७८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १४५९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
 
==नृसिंह सरस्वती यांची मराठीतील चरित्रे==