"कुलदीप पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1792684 by Tiven2240 on 2020-06-08T07:29:42Z
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
 
==कारकीर्द==
कुलदीप पवार मूळचे [[कोल्हापूर|कोल्हापूरचे]]. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती.कुलदीप वसंत पवार यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वसंतराव पवार मोटारसायकलीच्या एजन्सीचे काम करत आणि त्यांच्या आई शांतादेवी यांनी गुजराथी शाळा चालवली होती. त्यांचे वडील व्हायोलिन आणि माऊथ ऑर्गन वाजवत तर त्यांच्या आई उत्तम नकला करत. कुलदीप पवार यांचे शिक्षण ' सेट झेविअर्स ' स्कुलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरवात केली.  शालेय वयातच त्यांनी सुलोचनबाईच्या हस्ते  बक्षिसेही मिळवली. ' ज्यांना काही करता येत नाही तेच सिनेमात जातात ' अशी त्या काळात समजूत होती, लोकांची धारणा होती. त्याचकाळात कुलदीप पवार यांनी या क्षेत्रात यायचे ठरवले . त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोधही झाला कारण त्यांचे म्हणणे होते आजोबांची ' जयश्री ' , ' प्रताप ' आणि ' वसंतबहार ' ही  सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ , असे त्यांचा वडिलांचे म्हणणे होते. एकीकडे अभिनयाचा ओढा आणि दुसरीकडे घरी होणारा विरोध यामध्ये ते पुरते सापडले होते आणि त्याच वेळी वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ' हिंदुस्थान गियर्स ' कंपनीमध्ये कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले आणि पगार होता फक्त ९० रुपये. संध्याकाळी काम संपल्यावर ते कामगारांची  नाटके बघत आणि याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि ' एक माती अनेक नाती ' या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आले. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही.  आपल्याला अभिनयात अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकले म्हणूंन ते पुण्यास आले. त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातील अनेक माणसे भेटली  परंतु काम काही मिळाले नाही म्हणून ते मुंबईला आले . त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून [[मुंबई]]स गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची [[प्रभाकर पणशीकर|प्रभाकर पणशीकरांशी]] ओळख झाली. त्या सुमारास ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली <ref name="लोकसत्ता२०१४०३२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/kuldeep-pawar-passed-away-410224/ | title = अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २४ मार्च, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = २८ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. त्यानंतर त्यांना कृष्णा पाटील दिग्दर्शित 'एक माती अनेक नाती' या चित्रपटात नायकाचे काम मिळाले आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरवात झाली.
 
''[[अरे संसार संसार]]'', ''[[शापित (चित्रपट)|शापित]]'', ''मर्दानी'', ''[[बिनकामाचा नवरा]]'', ''[[गुपचूप]]'', ''[[सर्जा (चित्रपट)|सर्जा]]'', ''[[वजीर]]'', ''[[जावयाची जात]]'' अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, ''इथे ओशाळला मृत्यू', ''निष्कलंक', ''अश्रूंची झाली फुले', ''वीज म्हणाली धरतीला', ''पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.