"नाताळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २२:
[[चित्र:Arbol Navidad 03.gif|thumb|ख्रिसमस ट्री]]
 
'''नाताळ''' किंवा '''क्रिसमस''' हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे [[२५ डिसेंबर]] या दिवशी [[येशू ख्रिस्त]] [[ख्रिस्तजन्म तारीख|यांचा जन्मदिन]] म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी [[एपिफनी]] सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.merriam-webster.com/dictionary/christmas ख्रिसमस | title = ''मेरियम - वेबस्टर'' | अ‍ॅक्सेसदिनांक = ६ ऑक्टोबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.newadvent.org/cathen/03724b.htm | title = ''द कॅथॉलिक एनसायक्लोपेडिआ''| वर्ष = १९१३| भाषा = इंग्लिश}}</ref> ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.<ref name="CRI-Christmastide">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.cresourcei.org/cyxmas.html| title = नाताळ सण |प्रकाशक = CRI / Voice, Institute|अ‍ॅक्सेसदिनांक = २५ डिसेंबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref> जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या [[पोप पहिला ज्युलियस]]ने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Why December 25th|दुवा=http://www.history.com/topics/christmas/history-of-christmas/videos/why-december-25th|प्रकाशक=History Channel|accessdate=०१ डिसेंबर २०१६}}</ref> त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या२५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम [[इ.स.पू. ३३६]] मध्ये [[रोम]] येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
 
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री [[सांता क्लॉज]] लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.msnbc.msn.com/id/16329025 | title = ''पोल: इन अ चेंजिंग नेशन, सॅंटा एंड्यूअर्स'' (''जनमत: देशातल्या बदलत्या वातावरणातही सांताक्लॉज टिकून आहे'') | प्रकाशक = असोसिएटेड प्रेस | दिनांक = २२ डिसेंबर, इ.स. २००६ | अ‍ॅक्सेसदिनांक = ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}.</ref> यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाताळ" पासून हुडकले