"तुळजा भवानी मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३७४ बाइट्सची भर घातली ,  १ महिन्यापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(माहिती)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{विस्तार}}
 
[[महाराष्ट्रातील]] साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे [[तुळजापूर]] क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी [[भगवती]] (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. [[महाराष्ट्र]] क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री [[शिवछत्रपती]] यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची [[कुलस्वामीनी]] आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांना [[भवानी तलवार]] देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://osmanabad.gov.in/mr/tourist-place/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%81/|title=श्री तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर {{!}} उस्मानाबाद जिल्हा {{!}} India|language=mr|access-date=2021-03-21}}</ref>
 
=== स्थापना ===
 
हे [[शहर]] [[बालाघाट|बालाघाटच्या]] एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी [[हेमाडपंती]] आहे. [[इतिहास]] व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर [[राष्ट्रकुट]] अथवा [[यादव|यादवकालीन]] मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.
 
===इतिहास===
हे [[शहर]] [[बालाघाट|बालाघाटच्या]] एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी [[हेमाडपंती]] आहे. [[इतिहास]] व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर [[राष्ट्रकुट]] अथवा [[यादव|यादवकालीन]] मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.
==== वैशिष्ट्ये ====
 
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे [[शहाजी]] महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता [[जिजाऊ]] महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत.पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर [[गोमुख]] [[तीर्थ]] येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच [[कल्लोळ]] तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा [[सिद्धीविनायक]] आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व [[अन्नपूर्णा]] देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.
 
पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या [[मुख्य]] [[गाभारा|गाभार्‍याचा]] दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईया आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.
 
श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर [[विजयादशमी|विजयादशमीच्या]] दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून[[पालखी]]तून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, [[खंडोबा]] आणि [[महादेव|महादेवाची]] मिरवणूकही निघते.
===नवरात्र===
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
==प्रशासन==
श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन देवस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा १९५० अन्वये पब्लिक ट्रस्ट म्हणून १९६२ साली झाली.
==प्रवास==
तुळजा भवानी मंदिर [[सोलापूर]] – [[संभाजी नगर]] रस्त्यावर असून [[सोलापूर]]हून ४२ कि.मी. तर [[धाराशिव]]दहून २२ कि.मी. अंतरावर आहे.
 
नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.
[[वर्ग:तुळजापूर तालुका]]
[[वर्ग:देवीची शक्तिपीठे]]
५,०३७

संपादने