"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ ४:
 
== जीवन ==
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या [[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील होते. त्यांचा जन्म [[सातारा|साताऱ्याला]] झाला. बालवयातच [[बाळाजी बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशव्यांच्या]] सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
 
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
 
[[माधवराव पेशवे|थोरल्या माधवराव पेशव्यांच्या]] मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, [[पुणे|पुण्याचे]] वैभव वाढवले. [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांच्या]] अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला. [[वाई]] येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत [[टिळक]]-[[आगरकर]]-[[विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर|चिपळूणकर]] यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. जवळच असलेल्या वसंत टाॅकीजमधील गोंगाटाच्या त्रासाला कंटाळून डेक्कन एज्युकेशन सोसयटीने ही शाळा टिळक रोडवर नेली. नान वाड्यात हल्ली पुणे महापालिकेचे हायस्कूल आहे.
 
नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौदाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही.महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तिची झळ बसत नाही.
 
==नाना फडणवीस यांच्या बायका{{संदर्भ हवा}}==
नाना फडणवीस यांचीदोन लग्ने झाली होती नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई.
 
रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनिवारवाड्यात आणून ठेविले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.
 
यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानी प्रतिबंधात ठेविले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.
 
पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले. पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनीं तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.
ओळ ६०:
* शर्थीनं राज्य राखिलं (कॅप्टन [[वासुदेव बेलवलकर]])
 
== हेही पाहापहा ==
* [[घाशीराम कोतवाल (नाटक)]]
* [http://jejuri.in/historical नाना फडणवीस]