"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
 
-----------------------------------
इंद्रसभेत गायनवादन करणारा अतिमानवी योनीतील एक वर्ग. गंधर्व हे ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले, असे हरिवंशात म्हटले आहे, तर कश्यप व अरिष्टा यांपासून ते उत्पन्न झाल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. चित्ररथ हा गंधर्वांचा अधिपती आणि इंद्र हा सर्व गंधर्वांचा स्वामी असल्याचे महाभारतात म्हटले आहे.
 
हा हा, हू हू, चित्ररथ, हंस, विश्वावसू, गोमायू, तुंबरू आणि नंदी असे गंधर्वांचे आठ भेद सांगितले जातात. अग्निपुराणात त्यांचे अकरा गण सांगितले आहेत. तसेच त्यांचे देव व मनुष्य असेही दोन भेद तैत्तिरीय उपनिषदात सांगितले जातात. देवांहून गंधर्वांचा दर्जा तीन पायऱ्यांनी खाली असल्याचे अन्यत्र म्हटले आहे. ऋग्वेदात गंधर्वांचे उल्लेख आहेत पण संख्या दिलेली नाही. यजुर्वेदात त्यांची संख्या २७, तर अथर्ववेदात ती ६,३३३ दिलेली आहे. बारा मासांचे बारा गंधर्व सूर्याचा मार्ग दाखवीत आणि त्याची स्तुती करीत आकाशात फिरतात, असेही म्हटले आहे. अमरकोशात त्यांचा देवयोनीत अंतर्भाव केलेला आहे.
 
गायनवादन कलेत ते निपुण असून इंद्रसभेत त्यांच्याकडे हेच नेमून दिलेले काम आहे. संगीतकलेस ‘गंधर्ववेद’ म्हटले जाते. संमोहनविद्या, चाक्षुषीविद्या (सूक्ष्मवस्तू मोठ्या स्वरूपात पाहण्याची विद्या) यांसारख्या काही गूढ व दिव्य विद्याही त्यांना अवगत आहेत. अंतराळातील जलसंचय त्यांच्याच ताब्यात असतो. सोमरसाचेही प्रथम तेच अधिपती होते, परंतु पुढे तो देवांनी कपटाने त्यांच्यापासून लांबविला.
 
गंधर्व हे सर्वांगसुंदर असून त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वाऱ्याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळहीशेवाळेही खातात. त्यांना फुलांचे, विशेषतः कुंदफुलांचे, वेड आहे. अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजशृंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वतःजवळ बाळगावी असे म्हणतात.
 
बौद्ध व जैन साहित्यांत गंधर्वांचे विपुल उल्लेख आढळतात. जैन साहित्यात त्यांना व्यंतर लोकातील देव मानले आहे. जैन देवतांतील एका यक्षासही ‘गंधर्व’ असे नाव आहे. भारतातील विविध चित्र-शिल्प शैलींत त्यांची अनेक सुंदर चित्रे व शिल्पे आढळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/गंधर्व" पासून हुडकले