"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०:
 
...मित्रहो!....आज मी आपल्यासमोर खान्देश असलेला भागांतील भोगोलिक परिस्थिती, राहणीमान, वेशभूषा, नामवंत सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक या गोष्टीचा मी आपल्या समोर निस्वार्थ लेखाजोखा माहितीपूर्ण मांडणार आहे.
 
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके, तेंव्हा मिळते भाकर...
 
खान्देशची ओळख सगळ्यांत आधी कवयित्री बहिणाबाईंच्या अगदी साध्या सोप्या बोलीभाषेतील; पण जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मार्मिक ओव्यांमधून होते. दर दहा कोसांवर भाषा बदलते; पण त्याच बरोबर जमीन, हवामान, पाणी यामध्येही बदल होतो. त्याचमुळे महाराष्ट्रात एकजिनसी मराठी समाज संस्कृती नांदत असली, तरी प्रत्येक भागात खाद्यसंस्कृतीमध्ये आमूलाग्र वेगळेपण जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रातही भौगोलिक वातावरण एकसारखे आढळत नाही. डोंगररांगा, नद्या आणि त्याचे खोरे, जमीन, पाऊस यामध्ये फरक दिसतो.
 
महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. 'देश तसा वेश' असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. खान्देशातील सकस काळी माती, कोरडे हवामान नि त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशीचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात.
 
खान्देश आणि तिथले जेवण म्हटले, की सगळ्यांत आधी डोळ्यासमोर येते ते म्हणजे जळगावचे वांग्याचे भरीत. इतकेच नाही, तर हिवाळ्यात जळगावमध्ये भरीत पार्टीही आयोजित केली जाते. भरीत पार्टी म्हणजे पर्यटक त्याचबरोबर खान्देशवासियांसाठी एक आनंदोत्सवच. तसे म्हणाल, तर भरीत महाराष्ट्रातच काय, तर भारतभर अगदी घरोघरी बनवले जाते; पण खान्देशी भरीताची बातच न्यारी. कारणही तसे आहे. खान्देशात पिकणारी भरीताची वांगीही भारी. पोपटी, पांढरट रंगाची ही वांगी इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. आहा, ती भाजत असतानाच जिभेची चव खवळते. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरची नि शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत केळीच्या पानावर नि भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. वाढणाऱ्याचा नि खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते ही भरीत पार्टी.
 
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोऱ्यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. ज्यांना खान हा शब्द मुसलमानी वाटतो, ते तो शब्द खान्देश असा लिहितात.
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले