"अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात ‘'''अखिल [[भारतीय]] बहुजन संत साहित्य संमेलना'''’चे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. प्रसिद्ध [[खंजिरी]]वादक व समाज प्रबोधन कीर्तनकार [[सत्यपाल महाराज]] या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.
 
संमेलनाचे मुख्य प्रवर्तक डॉ. महेंद्र धावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातून सुमारे पाच हजार प्रतिनिधींचा संमेलनात सहभाग होता. त्याप्रसंगी एकूण सहा परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या द्वारे वारकरी संतांची स्वराज्य स्थापनेमागील भूमिका, बहुजनांची लोककला आणि संस्कृती, प्रसारमाध्यमांतील बहुजन संत साहित्याची स्थिती, जाती निर्मूलनासाठी संतांचा दृष्टिकोन व संतांचा इतिहास आणि एकविसाव्या शतकापुढील आव्हाने आदी विषय हाताळण्यात आले.