"रेडिओ प्रेषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[रेडियो|रेडिओ]] तरंगांच्या प्रेषणाकरिता लागणाऱ्‍या  साधनसामग्रीतील एक प्रमुख साधन. याच्या द्वारे उच्च कंप्रता (दर सेकंदाला होणारी कंपन संख्या) असलेला विद्युत् प्रवाह निर्माण करण्यात येतो आणि प्रेषित करावयाच्या माहितीनुसार त्यात बदल करून तो आकाशकाला (अँटेनाला) पुरविण्यात येतो. रेडिओ प्रेषकाद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्‍या प्रवाहाची कंप्रता १० किलोहर्ट्झ ते १,००,००० मेगॅहर्ट्झ यांच्या दरम्यान असते. तथापि पुढील वर्णनात १,००० मेगॅहर्ट्झपेक्षा कमी कंप्रता असणाऱ्‍या प्रेषक मंडलांसंबंधीच विवेचन केलेले आहे. यापेक्षा जास्त कंप्रता असलेल्या रेडिओ तरंगांसाठी निराळी तंत्रपद्धती वापरावी लागते. अशा रेडिओ तरंगांना ⇨सूक्ष्मतरंग⇨[[सूक्ष्मतरंग]] म्हणतात. त्यांचा विचार येथे केलेला नाही [⟶रडार]. प्रेषित करावयाच्या माहितीनुसार या प्रवाहाचा परमप्रसर (मध्यम स्थितीपासून लंब दिशेने होणारे कमाल स्थानांतर), कंप्रता किंवा कला (एखाद्या संदर्भाच्या सापेक्ष असणारी व कोनात मोजली जाणारी स्थिती) यांत बदल होतो म्हणजेच त्यांचे ⇨विरूपण होते. विशिष्ट गरजेनुसार तयार केलेल्या अभिकल्पाचे (आराखड्याचे) हेतू साध्य करण्यासाठी विभिन्न रेडिओ प्रेषकांत अनेक विभिन्न प्रमुख घटकांचा समावेश करण्यात येतो.
 
प्रेषकाकडून प्रेषण करण्यासाठी आकाशकाला पुरविण्यात येणारी शक्ती काही अंश वॉट ते १० लक्ष वॉटपर्यंत असू शकते. कमी शक्तीचे प्रेषक प्रामुख्याने सुवाह्य वा चल (फिरत्या) सेवेसाठी (उदा., लष्करी वा पोलीस खात्यातील सेवेसाठी) वापरतात, तर उच्च शक्तीचे प्रेषक दूर अंतरापर्यंतच्या प्रेषणासाठी व दोन ठराविक बिंदुस्थानांपुरत्या मर्यादित अशा स्वरूपाच्या संदशवहनासाठी वापरले जातात.