"बांधकामाचे दगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बांधकामाचे सर्वांत जुने साहित्य म्हणून दगडाचा उल्लेख करता येईल....
 
No edit summary
ओळ २:
 
उत्पत्ती, अंतर्गत रचना आणि प्रमुख घटकद्रव्ये यांनुसार दगडांचे वर्गीकरण केले जाते. उत्पत्तीनुसार अग्निज, गाळाचे आणि रूपांतरित असे प्रकार पडतात. यांमधील अग्निज प्रकारात पातालिक, उपपातालिक व ज्वालामुखी असे उपप्रकार येतात [⟶अग्निज खडक]. अंतर्गत रचनेनुसार स्तरित व अस्तरित असे दोन प्रकार पडतात, तर घटकद्रव्यांनुसार सिलिकायुक्त, कॅल्शियमयुक्त व मृण्मय असे तीन प्रकार होतात.
 
 
'''भारतातील प्रमुख प्रकार''' : (१) ग्रॅनाइट : पातालिक अग्निज प्रकारातील हा दगड असून तो कठीण, बळकट व टिकाऊ असतो. पुलांचे आधारस्तंभ, बंदरातील धक्के, धरणे इ. प्रचंड बांधकामांसाठी तसेच खडी तयार करण्यासाठी तो वापरतात. सूक्ष्म कण असलेला हा दगड स्मारके, शिलालेख इत्यादींसाठी उपयुक्त असून त्यावर कोरीवकाम व पॉलिश सुलभतेने होते. या प्रकारातील खोंडालाइट (ओरिसा) आणि चार्नोकाइट (दक्षिण भारत) या जाती प्रसिद्ध आहेत. [⟶ग्रॅनाइट].