"पाणीपुरवठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयो...
(काही फरक नाही)

१९:११, ८ मार्च २०२१ ची आवृत्ती

पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती [→जलविद्युत् केंद्र] यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट (टाकाऊ द्रव्ये) वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने असा इशारा दिला आहे की, इ. स. २००० च्या सुमारास जेव्हा जगाची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा १९७० साली लागत होते त्याच्या तिप्पट पाण्याची जरूरी असेल आणि त्या वेळी जगाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागेल.