"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्थानी]] [[संगीत|संगीता]]<nowiki/>त ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. [[धृपद]], [[ख्याल]], [[ठुमरी]] यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो घराणे या संकल्पनेचा त्यात आढळ झाल्याखेरीज राहत नाही.
 
राण्यांविषयीचे आजपर्यंतचे लिखाण मुख्यतः [[इतिहास|ऐतिहासिक]] स्वरूपाच्या संगीतविचारात झालेले आढळते. घराण्यांचे आद्यपुरुष तसेच त्यांचे शिष्य-प्रशिष्य यांची चरित्रात्मक माहिती कमीअधिक स्वरूपात आणि थोड्याफार व्यवस्थित पद्धतीने लिहिली गेली आहे. घराण्यांविषयीची तात्त्विक चर्चा मात्र त्या मानाने कमी झाली आहे. वास्तविक पाहता घराणे म्हणजे काय, हाच मूलभूत प्रश्न सर्वांसमोर असला, तरी त्याचे उत्तर शोधण्याची दिशा ही आजपर्यंत बऱ्याचशा प्रमाणात माहिती गोळा करणे, ह्याच स्वरूपाची राहिली आहे. घराणे या संकल्पनेचा उलगडा करण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उपपत्ती म्हणून पद्धतशीरपणे न मांडल्या गेलेल्या, पण रूढ असलेल्या काही मतांच्या संक्षिप्त विचारांतून हे सहजपणे ध्यानात येईल.