"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्थानी]] [[संगीत|संगीता]]<nowiki/>त ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, [[ठुमरी]] यांसारखे गायनप्रकार असोत सतार, तबला इ. वाद्ये असोत किंवा नृत्यकला असो घराणे या संकल्पनेचा त्यात आढळ झाल्याखेरीज राहत नाही.
 
राण्यांविषयीचे आजपर्यंतचे लिखाण मुख्यतः [[इतिहास|ऐतिहासिक]] स्वरूपाच्या संगीतविचारात झालेले आढळते. घराण्यांचे आद्यपुरुष तसेच त्यांचे शिष्य-प्रशिष्य यांची चरित्रात्मक माहिती कमीअधिक स्वरूपात आणि थोड्याफार व्यवस्थित पद्धतीने लिहिली गेली आहे. घराण्यांविषयीची तात्त्विक चर्चा मात्र त्या मानाने कमी झाली आहे. वास्तविक पाहता घराणे म्हणजे काय, हाच मूलभूत प्रश्न सर्वांसमोर असला, तरी त्याचे उत्तर शोधण्याची दिशा ही आजपर्यंत बऱ्याचशा प्रमाणात माहिती गोळा करणे, ह्याच स्वरूपाची राहिली आहे. घराणे या संकल्पनेचा उलगडा करण्याच्या दृष्टीने त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उपपत्ती म्हणून पद्धतशीरपणे न मांडल्या गेलेल्या, पण रूढ असलेल्या काही मतांच्या संक्षिप्त विचारांतून हे सहजपणे ध्यानात येईल.
 
घराणे म्हणजे त्यातील मुख्य कलावंताच्या मूळ गावाच्या नावापलीकडे फारसे काही नाही, असे एक मत आहे. [[आग्रा]], [[ग्वाल्हेर]], [[जयपूर]] इ. ख्यालगायकांच्या घराण्यांची नावे दिल्ली, बनारस, लखनौ, इ. तबलावादकांच्या घराण्यांची नावे किंवा ठुमरीगायकांतील लखनौ, बनारस इ. नावे पाहून हे मत स्वीकारणीय वाटले, तरी ते तितकेसे ग्राह्य नाही. त्याला दोन कारणे आहेत. एक तर गावाच्या नावावरून न ओळखली जाणारी घराण्यांची नावेही आढळतात. उदा., ख्यालगायनात गोखले घराणे धृपदगायनात डागर, नौहार वगैरे घराणी. याहूनही महत्त्वाचे कारण असे, की गावावरून घराण्याचे नाव ठरणे, ही या संकल्पनेच्या विकासातील केवळ एक अवस्था ठरते. कारण आज घराण्याची नावे घेताच बोध होतो, तो गायन-वादन पद्धती, पेशकारीच्या शैली यांमधील वैशिष्ट्ये आणि फरक यांचाच. ग्रामनामांवरून घराण्यांच्या ऐतिहासिक विकासावर प्रकाश पडला, तरी तात्त्विक चर्चेत त्यामुळे काही भर पडत नाही. तात्त्विक विचारासाठी घराण्यांचा स्वरूपविचार हाच मार्ग समोर राहतो.