"चक्री कर्तन यंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अनेक तीक्ष्ण दाते असलेल्या फिरणाऱ्या चक्री कर्तकाने धातू कापण्...
(काही फरक नाही)

१९:०३, ८ मार्च २०२१ ची आवृत्ती

अनेक तीक्ष्ण दाते असलेल्या फिरणाऱ्या चक्री कर्तकाने धातू कापण्याचे काम करणारे यंत्र. अशा यंत्राचे अनेक प्रकार असून त्यांतील दोन प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. आ. १ (अ) मधील यंत्रात आडव्या तर्कूवर (दांडीवर) चक्री कर्तक बसविलेला असतो व तो उभ्या पातळीत फिरतो. त्याच्या खालच्या बाजूने सरकणाऱ्या टेबलावर कापावयाची वस्तू बसविलेली असते.