"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ? दृश्य संपादन
ओळ १४:
 
वाद्यसंगीत व ख्याल हा गायनप्रकार एवढ्यांपुरतेच घराण्यांविषयीचे हे विवेचन मर्यादित आहे, हा या उपपत्तीवरील एक आक्षेप. शिवाय भारतीय संगीत हे रागसंगीत असल्याने ख्यालामध्ये अथवा इतर आविष्कारप्रकारांत आलाप इ. जे टप्पे अपरिहार्यतेने येतात, त्यांचे विवेचन घराण्याविषयीच्या उपपत्तीच्या संदर्भात झालेले नाही.
 
अशोक रानडे यांनी ''संगीताचे सौंदर्यशास्त्र'' (१९७१) या पुस्तकात घराणे म्हणजे संगीतविश्वातील घटकांची व्यवस्था लावणारा सम्यक दृष्टिकोण, अशी व्यापक उपपत्ती मांडली आहे. सर्व घराण्यांना अभिप्रेत असलेले सांगीतिक साध्य वेगवेगळे असल्याने विविध घटकांना कमीअधिक महत्त्व देऊन त्यांची मांडणी होत असते आणि प्रसारण व संकुचन या अधिक व्यापक सांगीतिक प्रवृत्तींनी प्रभावित होऊन संगीतप्रकारांचा आविष्कार करणारी घराणी आपापला सांगीतिक संसार थाटत असतात, असा रानड्यांच्या विवेचनाचा इत्यर्थ आहे. घराण्यासंबंधीच्या उपपत्तीच्या संदर्भात ख्यालगायकीच्या टप्प्यांचे विवेचनही त्यांनी केले आहे. ख्यालगायकीखेरीज इतर संगीत व्यवहाराचा विचार न करण्याची मर्यादा याही उपपत्तीत दिसते.