"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १०:
 
घराणे म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर संगीत-स्वरूपविषयक तात्त्विक विचारात शोधण्याचेही प्रयत्न काही प्रमाणात झाले. वा. ह. देशपांडे यांच्या ''घरंदाज गायकी'' (१९६१) या ग्रंथात घराण्यांविषयीचा महत्त्वाचा तात्त्विक विचार आढळतो. काही पिढ्यांचे सातत्य, घराण्याचे असे खास कायदे आणि प्रभावशाली गुरूचे आवाजधर्म या मूलभूत तत्त्वांवर घराण्यांची निर्मिती अवलंबून असते, असे देशपांडे यांचे विवेचन आहे. स्वर आणि लय हे दोन ध्रुव आणि मधली संदिग्ध व सूक्ष्म समतोलकेंद्रे ह्यांवर अनुक्रमे किराणा, आग्रा, ग्वाल्हेर व जयपूर या ख्यालगायकींतील घराण्यांची स्पष्टीकरणासह ते स्थापना करतात.
 
या उपपत्तीवरील आक्षेप पुढीलप्रमाणे नोंदविता येतील : (१) स्वर आणि लय सर्व घराण्यांत असल्याने या तत्त्वांची द्विध्रुवात्मक मांडणी अयोग्य ठरते. त्याचप्रमाणे समतोलकेंद्रांतील घराण्यांच्या तरतमभावाचे साधार विवेचन आढळत नाही. (२) घराणे ही संकल्पना वाद्यसंगीत, सुगम संगीत इत्यादींनाही लागू होत असल्याने केवळ ख्यालगायकीपुरतेच विवेचन मर्यादित ठेवून घराण्यांविषयीची उपपत्ती मांडणे तर्कशुद्ध नाही. (३) साध्या क्रियेपेक्षा गुंतागुंतीची क्रिया सुंदर, नक्की वा जोरकस आवाजाच्या लगावापेक्षा मोकळा आणि आकारयुक्त आवाज सुंदर यांसारखी तत्त्वे वा यांसारख्या कसोट्या सगळीकडे सारख्याच पात्रतेच्या असतात, असा देशपांड्यांच्या विवेचनाचा रोख आहे पण त्यात फारसे तथ्य नाही. कारण ख्यालगायन या संगीतव्यवहारातील मर्यादित क्षेत्रापुरतेच हे खरे असू शकेल. एकंदर सांगीतिक आशयाच्या संदर्भात चिरक्या आवाजासारख्या वरवर पाहता असांगीतिक वाटणाऱ्या गोष्टीही कलाकृतीच्या सिद्धीतील महत्त्वाचा घटक ठरू शकतात. खरे पाहता सुंदर-असुंदर यापेक्षा प्रस्तुत-अप्रस्तुत ही भाषाच कलाविचारात योग्य होय. नाहीपेक्षा निम्म्याहून अधिक संगीतव्यवहार बाद ठरवावा लागण्याची आपत्ती ओढवेल. डॉ. बी. सी. देव यांनी घराण्याविषयीची तात्त्विक चर्चा भाषाशास्त्रीय दृष्टिकोण स्वीकारून केली आहे. (''इंडियन म्यूझिक'', १९७४). भारतीय संगीत हे सर्वसामान्य म्हणजे मोठे वर्तुळ. त्यात हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत ही विशेष भेद दर्शविणारी उपवर्तुळे व या उपवर्तुळांत घराणे आणि ‘बाणी’ ही लहान उपवर्तुळे असतात. शिवाय घराण्याच्या उपवर्तुळात प्रत्येक कलांवंताचे स्वतःचे उपवर्तुळ अशी ही एकूण मांडणी. या आकृतिबद्ध मांडणीस तुल्यबळ अशा भाषिक मांडणीही देव पुढे ठेवतात. एकंदर शब्दकळा, तीत विविध बोली, बोली वापरणाऱ्यांच्या विविध रचना या तऱ्हेने ही परंपरा सिद्ध होते.