"सेर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १८:
सेर्न कौन्सिल बहुधा पाच वर्षांसाठी सरसंचालकाची नेमणूक करते. सरसंचालक संघटनेचा व्यवस्थापक असून त्याला संचालनालय मदत करते. त्यातील सदस्यांचे प्रस्ताव तो कौन्सिलसमोर मांडतो. आपला अहवाल तो थेट कौन्सिलला सादर करतो. संशोधनाच्या कार्यक्रमांसमोरील गरजा भागविण्यासाठी कोणती जुळवाजुळव करणे गरजेचे आहे, तेही तो कौन्सिलला सुचवू शकतो. तो सेर्न प्रयोगशाळेचाही व्यवस्थापक असून विविध विभागांच्या मदतीने तो प्रयोगशाळेचे काम चालू ठेवतो. संचालनालय आंतरराष्ट्रीय परस्परसंबंध चालू ठेवण्याचे काम करते.
 
जुलै २०१२ मध्ये [[ऑस्ट्रिया]], [[बेल्जियम]], [[बल्गेरिया]], [[चेक प्रजासत्ताक]], [[डेन्मार्क]], [[फिनलंड]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[ग्रीस]], [[हंगेरी]], [[इटली]], [[नेदरलँड्स|नेदर्लंड्स]], [[नॉर्वे]], [[पोलंड]], पोर्तुगाल, स्लोव्हाक प्रजासत्ताक, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड व युनायटेड किंग्डम हे वीस देश सेर्नचे सदस्य होते. यांशिवाय रूमानिया, इझ्राएल व सर्बिया हे देश सदस्य होण्याच्या वाटेवर असलेले सहसदस्य होते. तसेच जे देश व आंतरराष्ट्रीय संघटना सेर्नचे सदस्य होऊ शकत नाहीत वा ज्यांना सहजपणे सदस्य होता येत नाही असे यूरोपियन कमिशन, भारत, जपान, रशियन फेडरेशन, तुर्कस्तान, युनेस्को आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे सेर्नचे निरीक्षक सदस्य होते. यांव्यतिरिक्त सदस्य नसलेले परंतु सेर्नशी सहकार्य करार करणारे ३७ देश असून १९ देशांचा सेर्नबरोबर वैज्ञानिक बाबतीत संपर्क होत असतो.
 
सदस्य देशांची काही खास कर्तव्ये व विशेषाधिकार वर दिले आहेत. शिवाय सदस्य देश सेर्नच्या प्रकल्पांच्या भांडवली व कामचलाऊ खर्चाला देणगीद्वारे मदत करतात व त्यांचे प्रतिनिधी सेर्न कौन्सिलमध्ये असतात. सेर्न संघटना व तिची कामे यासंबंधातील सर्व महत्त्वाच्या निर्णयांची जबाबदारी या प्रतिनिधींची असते. निरीक्षक सदस्य सेर्न कौन्सिलच्या बैठकांना हजर राहू शकतात व त्यांना कौन्सिलचे दस्तऐवज मिळू शकतात. मात्र निरीक्षक सदस्य सेर्नच्या निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीत भाग घेऊ शकत नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेर्न" पासून हुडकले