"सेर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
वरील हंगामी कौन्सिल स्थापण्याचा प्रस्ताव भौतिकीचे [[नोबेल पारितोषिक]] विजेते इझिडॉर इझाक राबी यांनी यूनेस्कोच्या पाचव्या सर्वसाधारण परिषदेत मांडला होता. याद्वारे दुसऱ्या महायुद्धानंतर विविध कारणांमुळे अमेरिकेत स्थलांतर केलेल्या अनेक यूरोपीय भौतिकीविदांना यूरोपात परत येऊन संशोधनाच्या कामात सहभागी होता येणार होते. मोठ्या प्रमाणावरील प्रयोगांसाठी अतिऊर्जावान मूलकणांच्या शलाका निर्माण करणारे ⇨ ''कणवेगवर्धक'' वापरणाऱ्या सुविधा सेर्नने उभारल्या. यांमुळे यूरोपातील मूलकण भौतिकीतील संशोधनकार्याला चालना मिळाली व गती प्राप्त झाली. अशा रीतीने सेर्न हे मूलकणांच्या अभ्यासाचे जगातील सर्वांत मोठे आणि संशोधन व संगणक सामग्री विकसित करण्याच्या कामातील आघाडीवरचे संशोधन केंद्र बनले आहे.
 
सेर्न संघटना १९५४ मधील एका प्रस्तावानुसार अस्तित्वात आली. त्यामध्ये संशोधन (विश्वाविषयीच्या प्रश्नांचा शोध घेणे व त्यांची उत्तरे शोधणे), तंत्रविद्या (तंत्रविद्येच्या सीमांचा विस्तार करणे), सहकार्य (विज्ञानाद्वारे राष्ट्रे एकत्र आणणे) आणि शिक्षण (भावी वैज्ञानिकांना प्रशिक्षित करणे) ही संघटनेची इतिकर्तव्ये स्पष्टपणे नमूद केली होती. सदर प्रस्तावातील काही प्रमुख मुद्दे असे आहेत : ‘निसंदिग्धपणे शुध्द वैज्ञानिक व मूलभूत स्वरूपाच्या अणुकेंद्रीय संशोधनात संघटना यूरोपीय देशांमध्ये सहकाऱ्याची भावना निर्माण करील. लष्करी गरजांच्या कामांशी संघटनेचा कोणताही संबंध नसेल आणि येथील सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधनाची फले व निष्कर्ष प्रसिद्ध केले जातील अथवा अन्य प्रकाराने सामान्यपणे इतरांना उपलब्ध करून दिले जातील’.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेर्न" पासून हुडकले