"सेर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: मूलभूत भौतिकीमध्ये संशोधन करणारी जागतिक दर्जाची संघटना. अशा प्र...
 
No edit summary
ओळ १:
सेर्न ही मूलभूत भौतिकीमध्ये संशोधन करणारी जागतिक दर्जाची संघटना. अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने १९५२ मध्ये यूरोपात एक हंगामी संस्था स्थापन करण्यात आली. तिचे फ्रेंच भाषेतील नाव Conseil Europe’en pouer la Recherche Nucle’aire (यूरोपियन कौन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च) हे होते. त्या नावाचा संक्षेप म्हणजे CERN (सेर्न) होय. अणूचे अंतरंग जाणून घेण्यासाठी त्या काळात शुद्ध भौतिकीय संशोधनावर वैज्ञानिकांचे लक्ष केंद्रित झालेले असल्याने संस्थेच्या नावात न्यूक्लिअर हा शब्द आला होता. ही संघटना १९५४ मध्ये अधिकृतपणे स्थापन झाली, तेव्हा आधीचे कौन्सिल विसर्जित करून तिचे नाव यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (अणुकेंद्रीय संशोधनासाठीची यूरोपीय संघटना) असे झाले. तथापि, सेर्न हे तिचे मूळचे संक्षिप्त नाव तसेच राहू दिले. नंतर द्रव्याचे अधिक सखोल म्हणजे अणूपेक्षा लहान घटकांचे (मूलकणांचे) ज्ञान संपादन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि मूलकण भौतिकी (किंवा उच्च ऊर्जा) हे या संघटनेचे संशोधनाचे मुख्य क्षेत्र निश्चित झाले. यामध्ये द्रव्याचे मूलभूत घटक असलेल्या मूलकणांचे आणि मूलकणांदरम्यान कार्य करणाऱ्या प्रेरणांचे अध्ययन करण्यात येते. यामुळे सेर्नमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेला सामान्यपणे मूलकण भौतिकीसाठीची यूरोपीय प्रयोगशाळा असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेर्न" पासून हुडकले