"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ४०:
 
वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).
विद्यार्थिदशेत त्यांच्यावर [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा जोतिबा फुले]] व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातुनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला (१९४१). या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.
 
'''कार्य''':